9ऑगस्ट रोजी समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहा : प्रभाकर आप्पा सोनवणे

9ऑगस्ट रोजी समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहा : प्रभाकर आप्पा सोनवणे मनवेल ता.यावल : ९ आँगष्ट्र रोजी जागतिक आदीवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोळी समाज जिल्हाध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी यावल येथे आयोजित केलेल्या तालुका बैठकीत केले.यावल तालुका आदीवासी टोकरे कोळी सामाज बांधवाची बैठक जिनिंग प्रेस संघाच्या कार्यलयात आयोजित करण्यात आली होती.९ आँगष्ट्र २३ रोजी जागतिक आदीवासी दिन साजरा करण्या बाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.यावल जिनींग प्रेस सभागृहा पासून तर धनश्री टाँकीज पर्यत सजीव देखावा काढुन आदीवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा विषय सर्वाचा मते मंजूर करुन उत्सव समीतीची कार्यकरीण जाहिर करण्यात आली. अध्यक्षपदी पाडळसा येथील नामदेव कोळी, उपाध्यक्षपदी हिरालाल सोनवणे,खजिनदार जयेश कोळी ,प्रसिद्ध प्रमुख पदी गोकुळ कोळी (मनवेल )तर सचिवपदी नंदुभाऊ सोनवणे ,तर संदिप सोनवणे ,सुधाकर कोळी,मयूर कोळी,प्रमोदभाऊ सोनवणे ,प्रविण कोळी,नितीन सपकाळे ,बापुराव कोळी,विशाल कोळी,कीरण तायडे, प्रदिप सपकाळे यांची सदस्य पदी निवड करण्यात आली.आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी आपल्या गावातील सर्व समाज बांधव , विविध पदा असलेल्या महिलासह प्रत्येक गावातील सरपंच व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने आदिवासी बांधवाना कार्यक्रम उपस्थिती द्यावी असे आवाहन जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी मार्गेदशन केले.यावेळी समाधान सोनवणे ,संदिपभैय्या सोनवणे ,नंदुभाऊ सोनवणे ,प्रमोद कोळी सह समाज बांधवांनी मार्गेदशन केले.यावेळी अँड अजय कोळी, सरपंच परीषदचे तालुकाध्यक्ष व वढोदा सरपंच संदिपभैय्या सोनवणे, समाधान सोनवणे थोरगव्हाण, अंजाळा सरपंच यशवंत सपकाळे, भालोद सरपंच प्रदीप कोळी, बामणोद सरपंच राहुल तायडे, पिंपरूड सरपंच योगेश कोळी, पिंप्री सरपंच मोहन सपकाळे, निमगाव सरपंच संजय तायडे, सांगवी खु. सरपंच डिगंबर कोळी, प्रमोद कोळी यावल, पाडळसा, गोकुळ कोळी मनवेल, ,योगेश कोळी,खेमचंद कोळी , पदमाकर कोळी,प्रविण कोळी सांगवी खुर्द , , संदिप कोळी, अनिल कोळी, नितीन कोळी अंजाळे सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.खेमचंद कोळी यांनी प्रास्तविक केले , सुत्रसंचालन प्रमोद कोळी यांनी केले तर सरपंच परीषदचे तालुकाध्यक्ष तथा वढोदा सरपंच संदिपभैय्या सोनवणे यांनी आभार मानले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!