नेरच्या सुपुत्राची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती
नेर: धुळे तालुक्यातील नेर येथील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व निवृत्त मुख्याध्यापक श्री.राजेंद्र काशिनाथ वाघ (आर के वाघ सर) यांचा सुपुत्र चि.पलाश राजेंद्र वाघ यांचे महाराष्ट्र पोलीस दलात एमपीएससी परीक्षेद्वारे उत्तीर्ण झाले असून पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली,तसेच नेर गावातून व परिसरातून कौतुक होत आहे.व पुढील वाटचालीस देखील शुभेच्छा देण्यात आल्या.त्याबद्दल नेर गावात नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाणे,निवृत्ती बॅंक अधिकारी प्रकाश खलाणे,दीपक शेठ खलाणे,पत्रकार संतोष ईशी,ग्रामपंचायत सदस्य दीपक मोरे,बाबा वाघ,राकेश अहिरे,देऊरचे अर्जुन शेवाळे, रावसाहेब देवरे,तात्या बोढरे,रवी बोरसे यांच्या वतीन सत्कार करण्यात आला.तसेच मान्यवर नेर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ✍🏻 नेर प्रतिनिधी दिलीप साळुंखे