आचार्य अत्रे यांच्या १२५जयंती वर्षानिमित्त सध्याच्या राजकीय परिस्थितीवर लेख स्पर्धा. .

*आचार्य अत्रे यांच्या १२५जयंती वर्षानिमित्त सध्याच्या राजकीय परिस्थितीवर लेख स्पर्धा. .!* मुंबई (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या (शतकोत्तर रौप्यमहोत्सवी) जयंती वर्ष १३ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होत आहे. त्या निमित्ताने मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वांसाठी राज्यस्तरीय ‘अग्रलेख स्पर्धा’ आयोजित करण्यात आली असल्याचे संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी घोषित केले आहे. आचार्य अत्रे यांचा निकटचा सहवास लाभलेले मुंबई वरळी कोळीवाड्यातील विक्रमी नगरसेवक दिवंगत कॉ. मणिशंकर कवठे यांच्या स्मरणार्थ निशुल्क स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रदीप कवठे पुरस्कृत या स्पर्धेची शब्दमर्यादा ६०० असून युनिकोड मराठी टायपिंग करून  chalval1949@gmail.com यावर अथवा राजन देसाई 8779983390 या मोबाईलवर दिनांक ५ ऑगस्ट पर्यंत अग्रलेख पाठवावा. पहिल्या ५ स्पर्धकांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह तसेच स्पर्धेतील सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सर्व नागरिक भाग घेऊ शकतात तसेच अधिक माहितीसाठी प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांच्याशी 8652100400 संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!