देहली नदी काठ व धरण क्षेत्रातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी

देहली नदी काठ व धरण क्षेत्रातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी

तु.प्र.चिनावलकर

नंदुरबार : दिनांक २२ जुलै २०२३ (जिमाका वृत्त ) नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथकांत असलेल्या देहली मध्यम प्रकल्पाच्या (ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) धरण क्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदी काठावरील व कालवा क्षेत्रातील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचा इशारा नंदुरबार मध्यम प्रकल्पाच्या विभागीय पथकाचे कार्यकारी अभियंता तु.प्र.चिनावलकर यांनी दिल्या आहेत.

सद्यस्थितीत देहली प्रकल्पात पाणी पातळीत १९७.७० मी. ची नोंद झाली असून प्रकल्पात १०० टक्के क्षमतेने पाणी साठा झाला आहे. पुढील काही तासात या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन केव्हाही पाण्याचा विसर्ग चालु होऊ शकतो. त्यामुळे देहली प्रकल्प व नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असल्याचे तु.प्र.चिनावलकर यांनी कळवले आहे.

देहली नदीच्या डाव्या व उजव्या काठावरील तसेच कालव्यावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये गुर-ढोरे सोडू येऊ नयेत. कोणत्याही नागरिकाने नदीपात्रात स्वत: जावू नये, याबाबतची आवश्यक ती खबरदारी घ्यावी असेही आवाहन तु.प्र.चिनावलकर यांनी केले आहे.

देहली नदी काठावरील गावे

उजवा नदी काठ :- रांझणी, घुनसी, लालपुरा, वल्ली, कोराई

डावा नदी काठ : रायसिंगपुर, पुर्नवसन आंबाबारी, जुना नागरमुथा, नवा नागरमुथा, मध्यम नागरमुथा, घोटपाडा, कोराई,
खापर * उजवा नदी काठ :*
रांझणी, घुसी, लालपुरा, वल्ली, कोराई

कालवा क्षेत्रातील गावे:
उखळसाग, भोयरा, सोनपाटी, कोयलीविहिर, खटकुवा,पोहरा, गंगापुर, घंटाणी, वाकाधामन, अंकुशविहीर, कंकाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!