अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भेलके महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन

*मा.अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भेलके महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन*….पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव भेलके महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 या दिवशी करण्यात आले. या रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंतरिक कलागुणांना वाव मिळावा या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृती तसेच अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर सुरेख अशा रांगोळी काढण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सनस मानसी, भोसले मृणाल, कांबळे ऋतुजा आणि सणस अमृता या प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या तसेच शेटे अनुजा, शेटे ऋतुजा, शेटे श्रावणी आणि शिळीमकर अंजली या द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी मिळवला. तर द्वितीय क्रमांक वाल्हेकर प्रीती, वाल्हेकर साक्षी आणि सलोनी मांढरे या द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनींनी पटकावला. तर तृतीय क्रमांक पवार सानिका खोपडे भाग्यश्री मडके वैष्णवी या प्रथम वर्ष बीबीएससी शाखेच्या विद्यार्थ्यांचा आला या स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे सर यांच्या नेतृत्वाखाली प्रा .ऋतुजा साळुंखे आणि प्रा. कोमल पोमण यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. जाधवर डी. एस, प्रा. माऊली कोंडे यांनी काम पाहिले. स्पर्धेला महाविद्यालयातील डॉ. जगदीश शेवते,डॉ. हिमालया सकट, प्रा.सहदेव रोडे, प्रा.भगवान गावित,डॉ.सचिन घडागे श्री.विकास ताकवले,श्री.महेश दळवी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!