अण्णासाहेब मगर महाविद्यालय व हडपसर पोलीस स्टेशन यांची व्यसनमुक्ती सायकल रॅली

अण्णासाहेब मगर महाविद्यालय व हडपसर पोलीस स्टेशन यांची व्यसनमुक्ती सायकल रॅली ता.२५ –
अण्णासाहेब मगर महाविद्यालय व हडपसर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णासाहेब मगर महाविद्यालय ते मगरपट्टा सिटीपर्यंत व्यसनमुक्ती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सहायक पोलीस निरीक्षक सारिका जगताप, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे सहभागी झाले होते. तर मागरपट्टा सिटी येथे रॅलीचे स्वागत माजी महापौर निलेश मगर व आयर्न मॅन डॉ. शंतनू जगदाळे यांनी केले.
समाजातील वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी सर्वांनीच जागरूक होणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती व प्रबोधनाची गरज असल्याचे मत सहायक पोलीस निरीक्षक सारिका जगताप यांनी व्यक्त केले.
कार्यक्षम युवा पिढी निर्व्यसनी राहिल्यास भारत विकसित होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून कोणत्याही व्यसनापासून दूर राहिले पाहिजेआयर्न मॅन डॉ. शंतनू जगदाळे यांनी मत व्यक्त केले.
आज तरूणांमध्ये व्यसन करण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. शाळेत जाणारया मुलांपासुन ते महाविद्यालयात शिकत असलेला तरूण व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहे. ही चिंतेची बाब असून युवकांनी शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष दिले पाहिजे. असे मत उपमहापौर निलेश मगर यांनी व्यक्त केले.
*पर्यावरण संवर्धन, प्रदूषण, वाहतूकीचे नियम पाळा, मुलगी वाचवा, व्यसन मुक्ती, प्लास्टिक वापर टाळणेबाबत जनजागृती यासारखे विविध संदेश फलक सायकलला लावून विद्यार्थी सहभागी झाले.अण्णासाहेब मगर महाविद्यालय येथून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये हडपसर पोलिसांसह महाविद्यालयातील सायकल प्रेमी असे सुमारे दोनशे सायकलपटू जनजागृती रॅलीत सहभागी झाले होते. मांजरी, सोलापूर रस्ता, हडपसर, डी .पी. रोड, माळवाडी, अमनोरा सिटी, मगरपट्टा सिटी असा सायकल रॅलीचा मार्ग होता.
या प्रसंगी गोपनीय विभाग अधिकारी उमेश शेलार, उपप्राचार्य अनिल जगताप, प्रा.प्रीतम ओव्हाळ, प्रा. अण्णासाहेब निंबाळकर, डॉ.सचिनकुमार शहा, डॉ.राजेश रसाळ, डॉ. नाना झगडे, डॉ.शरद गिरमकर, धनंजय बागडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शुभांगी औटी यांनी तर आभार उपप्राचार्य विलास शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!