चिमठाणे सार्वजनिक आरोग्य विभाग प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची वेबसाईट पाच महिन्यापासून बंद……
सार्वजनिक आरोगय विभागामार्फत केंद्र शासन पुरस्कृत प्रधान मंत्री मातृ वंदना योजना ही केंद्रसरकार कडून राबवली जाणारी योजना आहे .प्रधान मंत्री मातृ वंदना या योजनेमध्ये कुटुंबातील पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत 5000/- एवढी रक्कम आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोष्ट ऑफिस मधील खात्यात तीन टप्प्यात जमा केली जाते..गर्भधारणेपासून 150 दिवसाच्या आत पहिला 1000 चा हप्ता व 6 महिने पूर्ण झाल्यावर 2 रा हप्ता 2000 व प्रसूती नंतर जन्म नोंदणी व बालकास बीसीजी,ओपीव्ही,पेंटाव्हॅलेंट,वा त्या अनुषंगिक,लसीकरणाचा पहिला खुराक,दिल्यानंतर तिसऱ्या 2000 हप्त्याकरिता पात्र होतात. असे ऐकून तीन टप्यात 5000 हजाराचा लाभ दिला जातो ..….
- या योजनेचा कोण कोण अर्ज करु शकतात…..…..
दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील सर्व महिला योजनेच्या लाभाकरिता अर्ज करू शकतात..ही योजना एक वेळ लाभयोगची असून पहिल्या जीवित अपत्यापूर्तीच मर्यादित आहे..प्रत्येक टप्याचा लाभ मिळण्याकरिता त्या टप्याचा स्वतंत्र अर्ज शासकीय आरोग्य संस्थेत करणे आवश्यक असते… परंतु या योजनेची वेबसाईटचा 5 महिन्यापासून बँद असल्याचे चिमठाणे आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे …लाभार्ती महिलांना पाच ते सहा महिन्यांपासून एक ही लाभ मिळालेला नाही संकेतस्थळ बंद असल्या कारणाने लाभार्त्याना कुठलीच माहिती मिळू शकत नाही .व लाभ केव्हा मिळेल हे देखील आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगता येत नाही ..म्हणून लाभार्त्याना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत…या कडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी महिलांकडून होत आहे…..