*दाऊळ रस्त्यावरील रेल्वे गेट दर 15 मिनिटानी बंद होत असते व बाम्हणे रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाचे काम चालू आहे म्हणून सर्विस रोड दुरुस्ती करून देणे बाबत*दोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळीवरिल विषयाला अनुसरून आम्ही खाली सह्या करणारे विनंती निवेदन सादर करतो दाऊळ रस्त्यावरील रेल्वे गेट हे सतत दर 15/20 मिनीटानी बंद होत असते व या रेल्वे गेट मार्गाने दाऊळ, मंदाणे, झोतवाडे, शेंदवाडे, साहुर, तावखेडा प्र. न. व सिंधीकालनी सह जुने शहादा रोडवरील रहीवासी या रेल्वे गेट मार्गाने प्रवास करीत असतात. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी, शेतकऱ्यांना शेतमाल किंवा शेती उपयोगी खते तसेच आजारी रुग्णांना घेऊन जाण्यासाठी खुप त्रास होतो यात अनेक रुग्णांना दवाखान्यात नेत असताना प्राण सुध्दा गेले आहेत त्यामुळे तिन वर्षा पूर्वी सर्व पक्षीय रेल्वे रोको आंदोलन केले होते. तेव्हा रेल्वे प्रशासनाने आश्वासन दिले होते की लवकरच भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल बांधण्याचे काम चालू होईल मात्र आज तीन वर्ष झाले तरीही कुठलेच काम झाले नसुन रेल्वे प्रशासनाने तात्काळ जुने शहादा रोडवरील रेल्वे गेट जवळ अमरावती नदी जवळुन तात्पुरत्या स्वरूपात रेल्वे पुला खालुन डांबरी रस्ता तयार करुन द्यावा व काही महिन्यांनी रेल्वे गेट जवळ भुयारी मार्ग तयार करावातसेच बाम्हणे रस्त्यावरील रेल्वे गेट वरुन उड्डाण पूलाचे बांधकाम तात्काळ मार्गी लावावे व तात्पुरता त्या ठिकाणी सर्वीस रोडचे काम डांबरीकरणासहीत मजबुत करुन घ्यावाअन्यथा 15 ऑगस्ट 2023 रोजी महाविकास आघाडी महाराष्ट्र राज्य कडून दोंडाईचा येथे रेल्वेरोको आंदोलन केले जाईल कळावेशानाभाऊ सोनवणेशिवसेना उपजिल्हाप्रमुख धुळेशैलेश सोनारआबा मुंढे पाटील माजी सरपंच धमाणेकिसन पाटीलमनोज परदेशीनवनीत बागले आनंदा पाटिल ,पंजाबराव पाटिल भानुदास पाटील दादा कोळी दिनेश चव्हाण जगदिश पाटील राहुल पाटील रवि कोळी संतिष पाटील शामकांत पाटील आदीं सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
दाऊळ रस्त्यावरील रेल्वे गेट दर 15 मिनिटानी बंद होत असते व बाम्हणे रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाचे काम चालू आहे म्हणून सर्विस रोड दुरुस्ती करून देणे बाबत निवेदन*
