नेर जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती सरपंच गायत्रीदेवी जयस्वाल यांची भेट
नेर: धुळे तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद महादेव वस्तीतील शाळेस नेर ग्रामपंचायत सरपंच श्रीम गायत्रीदेवी जयस्वाल यांनी तसेच ग्रामविस्तार अधिकारी श्री बोरसे भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य श्री दयाराम दादा चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री बाळू अण्णा सोनवणे, माजी उपसरपंच श्री राजधर अमृतसागर यांनी भेट देऊन नवीन प्रस्तावित इमारतीच्या जागेची पाहणी केली.
यावेळी सरपंच मॅडम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.त्यांच्या अभ्यासाविषयी चौकशी केली व आनंद व्यक्त केला.विविध उपक्रमांची माहिती घेतली.शाळेचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करून उत्तम दर्जाची शालेय इमारत बांधून दिली जाईल व विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक उपलब्ध करून दिले जातील असे सांगितले.यावेळी स्वनिर्मित पुष्पगुच्छानी विद्यार्थ्यांनी मान्यवरांचा सत्कार केला.मुख्याध्यापक श्री रामभाऊ पाटील व श्री योगेश कोळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.प्रसंगी श्री शिवाजी पाटील,श्री.देविदास सावळे,सौ.शोभा पाटील,सौ.चित्राबाई गायकवाड हे उपस्थित होते. ✍🏻 नेर प्रतिनिधि दिलीप साळुंखे