मणिपूर का जळते आहे?
मणिपूर हे एक निसर्गसुंदर असून अनेकदा त्याची तुलना स्वित्झर्लंडशी केली जाते. मणिपूर खोऱ्याच्या मध्यभागात वसलेले इंफाळ हे राजधानीचे शहर सांस्कृतिक, व्यापारी व राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे आहे. येथील बाजारपेठ, पोलो मैदान, वस्तुसंग्रहालय, राजवाडा, सुवर्ण मंदिर, नृत्य अकादमी इ. उल्लेखनीय आहेत
मणिपूर राज्याच्या उत्तरेस नागालँड राज्य, पूर्व व आग्नेय दिशांना ब्रह्मदेश, दक्षिणेस मिझोराम हा केंद्रशासित प्रदेश, पश्चिमेस आसाम राज्य असून इंफाळ ही मणिपूरची राजधानी आहे. मणिपूर राज्यातील हवामान थंड, आरोग्यवर्धक आहे. उन्हाळ्यातही हवा सामान्यपणे थंडच असते.
ईशान्य भारतातील म्यानमारला लागून असणार्या सीमावर्ती राज्य मणिपूरमध्ये सध्या गृहयुद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. चुराचंदपूर, सेनापती, चंदेल, कांगपोकपी आणि टेंगनौपाल जिल्ह्यांमध्ये दंगली घडत आहेत. उपलब्ध व्हिडिओनुसार अनेक घरे जळून खाक झाली असून अनेक जण जखमी झाले आहेत. विविध प्रकारच्या बंदुका, घटक हत्यारे, क्रूड बाँब्ज इत्यादी वस्तू वापरून प्रचंड नासधूस करण्याचे काम आंदोलक करत आहेत. बंदुकीचे एक अख्खे दुकानच चुराचंदपूरमध्ये लुटले गेले. अशा भीषण परिस्थितीमुळे स्वाभाविकपणे सरकारने कर्फ्यू जाहीर केला आहे. विविध राज्यांतून सैनिकी व अर्धसैनिकी बलांच्या 120 तुकड्या, तसेच हवाई दलाच्या तुकड्या आजघडीला मणिपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. यात अजूनही वाढ होत आहे. बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूक ठप्प केली गेलेली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नाइलाजास्तव इंटरनेटही बंद करण्यात आले आहे. आठ हजारांहून अधिक लोकांची सुरक्षित स्थळी व्यवस्था लावण्यात यंत्रणांना यश आले आहे. चाळीस हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. इतकी प्रचंड दक्षता घेऊनही परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मणिपूर मध्ये ३४ अनुसूचित जमाती आहेत. त्यापैकी बहुतांश नागा आणि कुकी समुदायातील आहेत. राज्यात बहुसंख्येने असलेल्या मैतेई समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा हवा आहे.
मणिपूर राज्याच्या ५३ टक्के इतकी लोकसंख्या असलेल्या मेतई जमातीच्या लोकांना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यावरून हा वाद हिंसाचार घडुन आला आहे.
मणिपूर उच्च न्यायालयाने १९ एप्रिल रोजी एक फैसला सुनावला होता.ज्यात मैतई समाजाला अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करण्यात आले होते.पण मणिपूर उच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयाला नागा अणि कुकी समुदायातील लोकांनी आपला विरोध दर्शवला आहे.
मणिपूर राज्यातील मैतई समाजातील लोकांची अशी मागणी आहे की इंफाळ खोरयात मैतई समुदायातील लोकांची संख्या अधिक आहे.
बांगलादेश तसेच म्यामनार मधील लोकांची घुसखोरी वाढत असल्याने मैतई समुदायातील लोकांना अनेक समस्या अडीअडचणींना संकटांना सामोरे जावे लागत आहे.
अणि नागा अणि कुकी समुदायातील लोकांचा याबाबतीत विचार करावयास गेले तर टेकड्याच्या भागात असलेल्या नागा अणि कुकी समुदायातील लोकांना अशी कुठलीही समस्या नाही कारण त्यांना विविध कायद्यांदवारे याबाबत संरक्षण प्रदान करण्यात आले आहे.म्हणुन त्यांच्या जमीनीवर अतिक्रमण होण्याची कुठलीही भीती नाही.
मणिपूर राज्यामधील ९० टक्के इतका भाग टेकडींचा आहे.म्हणजेच मैतई समुदायातील लोकांनी बाहेरच्या लोकांकडून त्यांच्या वाडवडिलांपासुनच्या वडिलोपार्जित जमिनी बळकावल्या जात असल्याचा दावा केला आहे म्हणून यापासून संरक्षण प्राप्त होण्यासाठी मैतई समाजाला अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी मैतई समुदायातील लोकांकडून केली जात आहे.
सध्याच्या कायद्या मधील तरतुदीमुळे मैतई समाजातील लोकांना टेकडी भागात कायमस्वरूपी वास्तव्य करता येत नाहीये.
मैतई समुदायातील लोकांच्या ह्याच मागणींच्या पुर्ततेसाठी शेड्युल ट्राईब डिमांड कमिटीकडुन आंदोलन केले जात आहे
हे आंदोलन केवळ नोकरीमध्ये आरक्षण मिळविण्यासाठी नव्हे तर आपल्या वडिलोपार्जित जमिनीचे पिढयान पिढ्याच्या जपल्या जात असलेल्या संस्कृतीचे परंपरेचे भाषेचे संरक्षण करण्यासाठी मैतई समुदायातील लोकांकडून हे आंदोलन केले जात आहे.
मणिपूरच्या खोऱ्यात राहणारा मैतेई समाज आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या कुकीसह अन्य आदिवासी जमातींमधील संघर्ष जुना आहे. आदिवासी वस्त्यांमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई, आरक्षण, प्रादेशिक असमतोल, शांतता करार आदी मुद्यांवरून या संघर्षात भर पडली. तो कमी करून हिंसाचार रोखण्यासाठी राज्याचे नेतृत्व कमी पडल्याचे स्पष्ट दिसते.
आपण सर्व विकासाच्या गोंडस नावाखाली सामाजिक विषमता, बेरोजगारी, भ्रष्टाचार, संपत्तीचे असमान वितरण या समस्यांकडे या देशातील चंगळवादी माध्यमांमुळे डोळेझाक करत आहोत. विकास म्हणजे केवळ आर्थिक संपन्नता, दळणवळणाची आधुनिक माध्यमे, बाजारपेठ, रुंद रस्ते असे समजले; तर आपण स्वत:ची फसवणूक करून घेऊ. माणसाचे आरोग्य, मनःस्वास्थ्य, निसर्गाशी त्याचा तोल राखून त्याचा जरुरीपुरता वापर, समाजस्वास्थ्य, माणसाचे परस्परसंबंध, समाजातील विविध धर्मांच्या आणि वंशांच्या लोकांचे ऐक्य, साहित्य, संगीतकला अशा सर्वसमावेशक प्रगतीमुळे मनास मिळणारा उल्हास – अशी विकासाची व्याख्या सर्वत्र रूढ होत आहे. भारत या गोष्टींमध्ये समृद्ध आहे. पण आपण डोळ्यांवर पट्टी बांधून फक्त आर्थिक उत्पन्नाच्या मागे धावत आहोत व तेसुद्धा अल्पशा लोकांच्या फायद्यासाठी. भारतासारख्या देशात स्त्रियांना देवीचा दर्जा आहे तिथेच जर स्त्रियांची नग्न धिंड काढून अत्याचार केले जातात हे किती क्लेशदायक आहे. माणसाला माणूस म्हणून जगताना उत्पन्नापेक्षा समाजाच्या तळागाळातील लोकांचे जीवन सर्वार्थाने सुखी व संपन्न व्हावे, हे जेव्हा समजेल, तेव्हाच भारतात खरा उष:काल होईल.
प्रा. जाधवर दयानंद अर्थशास्त्र विभाग,
शंकरराव भेलके महाविद्यालय नसरापूर ८६६८६०२२१५