मणिपूरच्या घटनेतील आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा द्या, आदिवासी संघटनाची मागणी,
मणिपूर राज्यामध्ये आदिवासींच्या महिलांसोबत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली, ही निंदनीय घटना लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यातील तमाम आदिवासी संघटनांनी 26 रोजी बंदच्या हाक दिली, त्या अनुषंगाने प्रकाशा येथे, आदिवासी बांधवांकडून व माणुसकीच्या धर्म पाडून सर्व व्यापारी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, कर्मचाऱ्यासह नागरिकांनी आपापल्या व्यवसाय बंद ठेऊन कडकडीत बंद पाडण्यात आले,
प्रकाशा गावातील समस्त आदिवासी बांधव व नागरिकांकडून प्रकाशा गावातील डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक पासून निषेध मोर्चाला सुरवात झाली, मोर्चात वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकाचा सहभाग होता, या निंदनीय घटनेच्या तरुणांमध्ये मोठा आक्रोश पाहायला मिळाला, आदीवासी बांधवांकडून या घटनेतील मुख्य आरोपींना तातडीचा शोध घेऊन फॉक्स कायद्या अंतर्गत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी प्रकाशा गावातील समस्त आदिवासी बांधवांनी केली आहे, आंबेडकर चौक पासून तर बस स्थानकाच्या परिसरात असलेलं बिरसा मुंडा फलक जवळ मणिपूरच्या घटनेच्या जोरदार निषेध व्यक्त करून घोषणाबाजीने परिसर दणाणून उठला होता,
प्रकाशा दिवसभर कडकडीत बंद ठेवत शांतता ठेवण्याचे आवहान,अमर वळवी यांनी केले, मणिपूर घटनेच्या निषेध व्यक्त करताना उपस्थित असलेले, लो.नि सरपंच राजनंदनी भिल,
जि.प. सदस्य आरती भिल,
पं.स सदस्य जंग्या भिल,
अमृत ठाकरे, सुदाम ठाकरे, अमर पाडवी, प्रकाश ठाकरे, अरुण ठाकरे, भावडू ठाकरे,रवींद्र भिल,मनोज भिल, राजू भिल, यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होता, प्रकाशा बंद ठेऊन निषेध नोंदण्यासाठी सहभागी झालेले गावातील समस्त आदिवासी बांधवांसह नागरिकांच्या, अरुण ठाकरे, यांनी आभार मानून संपन्न केले,