बारामती विकासाचा मानबिंदू : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ
पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेत सूर्या थत्तू ‘घाटाचा राजा’ तर गणेश बेनिवाल हा ठरला राष्ट्रीय विजेता
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणजे दिलेला शब्द पाळणारे, स्पष्टवक्ते व प्रशासनावर पकड असलेले नेतृत्व आहे. राज्याचे क्रीडा धोरण तयार करताना ऑलंपिक भवन आणि आतंरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्याचा विचार दादांच्या मनात आहे. तो लवकरच आमलात आणला जाईल. आदरणीय शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार यांनी बारामतीचा केलेला विकास हा जगातीक दर्जाचा आहे. बारामती विकासाचा मानबिंदू असून देशात ग्रामीण भागात विकास करायचा असेल तर बारामतीकडे विकासाचे मॉडेल म्हणून बघितलं जाते. असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तथा महाराष्ट्र ऑलीम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा. ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी एशियन सायकल फेडरेशनचे सेक्रेटरी ओंकार सिंग, पुणे जिल्हा रा.काँ. पक्षाचे अध्यक्ष मा. प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मा. दिगंबर दुर्गाडे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. प्रशांत काटे, रा. कॉ. पक्ष, पुणे जिल्हा अध्यक्ष मा. सुरेश घुले, पुरूषोत्तम जगताप, बाळासाहेब तावरे, रा. कॉ. पक्ष बारामती तालुका अध्यक्ष मा. संभाजी होळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानद सचिव संदीप कदम यांनी केले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे (कंसात अंतर व नोंदवलेली वेळ)
१. पुणे ते बारामती पुरूषांसाठी राष्ट्रीय स्तर (१२० कि.मी.) स्पर्धेमध्ये राजस्थानच्या गणेश वेणीवाल, (२.४०.५०) याने प्रथम क्रमांक, महाराष्ट्राच्या सूर्या थत्तू (२.४०.५१) याने द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक- कर्नाटकच्या नंदाप्पा सायडी (२.४०.५२) याने पटकावला.
२. पुणे ते बारामती पुरूषांसाठी राज्यस्तर (१२० कि.मी.) स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांक सिध्देश पाटील (२.४०.५०) याने द्वितीय क्रमांक- अमन तांबोळी (२.४१.५३) याने आणि तृतीय क्रमांक- भूषण पाटील (२.४१.५९) याने प्राप्त केला.
३. सासवड ते बारामती (एमटीबी) सायकल खुली पुरूषांसाठी राज्यस्तर (८५ कि.मी.) स्पर्धेमध्ये पुण्याच्या विठठल भोसले (१.४०.४६) याने प्रथम क्रमांक, नाशिकच्या निसर्ग भांबरे (१.४०.४८) याने द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक- विकास रोठे (१.४०.५०) याने पटकावला.
४. माळेगाव ते बारामती मुलींसाठी राष्ट्रीय स्तर १८ वर्षावरील वयोगट (१५ कि.मी.) स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कर्नाटकच्या दिपिका फडतरे (२२.३१.९१) हिने, द्वितीय क्रमांक झैना पिरखान (२२.३५.०५) हिने तर तृतीय क्रमांक महाराष्ट्राच्या मनाली रत्नोपी (२२.३५.०७) हिने प्राप्त केला.
५. माळेगाव ते बारामती मुलींसाठी जिल्हा स्तर (१५ कि.मी.) १६ वर्षाखालील स्पर्धेमध्ये
अनुष्का राऊत (२५.४५.०५) प्रथम क्रमांक, आर्या ननावरे (३०.२०.०५) द्वितीय क्रमांक
६. माळेगाव ते बारामती मुलांसाठी जिल्हा स्तर १६ यवर्षाखालील (१५ कि.मी.) स्पर्धेमध्ये
उत्कर्ष गार्डी (२१.१२.५३) प्रथम क्रमांक, अनिश गार्डी (२६.०२.०५) द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक- मयुरेश पवार (२६.४७.८९) यास प्राप्त झाला.
याशिवाय पुणे ते सासवड राज्यस्तर स्पर्धेमध्ये अनुक्रमे दत्तात्रय चैगुले (४१.०३),प्रतिक पाटील (४१.०३), सेाहम शेट्टी (५१.०३), पुणे ते सासवड राष्टीय स्तर स्पर्धेमध्ये राजस्थानच्या मानव सारडा (४१.०३), राजस्थानच्या सुनिल गट (४१.०३), राजस्थानच्या सुरेश जाट (४१.०३) याने अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला.
राष्ट्रीय स्तरावर घाटाचा राजा हा किताब महाराष्ट्राच्या सूर्या थत्तू (९.०२) राज्य स्तरावर कोल्हापूरच्या सिध्देश पाटील (९.०२) यास प्राप्त झाला.
सासवड बारामती महाराष्ट्र पोलिस रेस पुरूष स्पर्धेमध्ये पुण्याच्या सतिश सावंत (२.३२.१०) सोलापूरच्या इंद्रजित वरदहार (२.३४.२०) नागपूरच्या अतुल कडू (२.३५.०२) याना नैपुण्य प्राप्त झाले तर महिला गटामध्ये नाशिकच्या आश्विनी देवरे (२६.२२.२० ), पुण्याच्या सारिका पाटील (२८.१०.१५), रमा करमरकर (३५.१५.२०) यांनी प्र द्वितीय तृतीय क्रमांकाचे नैपुण्य प्राप्त झाले.
या राष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेमध्ये देशभरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ४५० खेळाडू – सायकलपटू सहभागी सहभागी झाले होते.
दरम्यान गदिमा सभागृहात जितेंद्र भुरुक प्रस्तुत ‘गितोंका का सफर’ हा मराठी, हिंदी गाणी व नतीयांचा बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा.श्री. राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव मा.श्री. एल.एम. पवार, सहसचिव (प्रशासन) मा. श्री. ए. एम.जाधव तसेच सायकल असोसिएशनचे प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅली आणि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सर्व शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन अमृता खराडे, प्रा. नितीन लगड यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. सुरेश घुले यांनी केले.