प्रांतपाल एम.जे .एफ. ला.भोजराज नाना निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षा रोपण कार्यक्रम संपन्न…!
सावर्डे (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
प्रांतपाल MJF ला. भोजराज नाना निंबाळकर सर यांच्या वाढ दिवसा निमित्त लायन्स क्लब ऑफ सावर्डे यांच्या वतीने १० फणसांच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. सदर वेळी लायन्स क्लब ऑफ सावर्डेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
लायन्स क्लब ऑफ सावर्डे चे एनवोर्मेन्ट चेअर पर्सन ला डॉ. अरुण पाटील सर यांच्या नियोजनाखाली दहिवली येथे प्रांतपाल एम.जे .एफ. ला.भोजराज नाना निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम बुधवार दि. २६.७.२०२३ रोजी सकाळी ठीक ८.०० वाजता संपन्न झाला. लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.डॉ.निलेश पाटील आणि इतर सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांच्या हस्ते फणसांच्या रोपांची लागवड करण्यात आली. तसेच सदर रोपांची काळजी घेण्याबाबतची जबाबदारी लायन्स क्लब ने घेतली. झाडांचे महत्व, त्याचे उपयोग, एक तरी झाड प्रत्येकाने लावले पाहिजे आणि ते जगवले पाहिजे, आणि समाजापर्यन्त पोहोचवून जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत असे आवाहन अध्यक्ष ला.डॉ.निलेश पाटील यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष ला.डॉ. निलेश पाटील ,सचिव ला.सतीश सावर्डेकर ,खजिनदार ला.अरविंद भंडारी,MJF ला.गिरीश कोकाटे, ला.डॉ.अरुण पाटील, ला.डॉ. कृष्णकांत पाटील, ला.डॉ.समीद चिकटे उपस्थित् होते. कार्यक्रमाचे नियोजन ला.डॉ.अरुण पाटील यांनी केले, त्याबद्दल क्लबच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.