कोळसा खाणीच्या गैरव्यवहारात राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता, के एस कोपरा आणि केसी सामरिया यांना आज दिल्लीच्या विशेष न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यामध्ये विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांना चार वर्षाची, तर उर्वरित लोकांना तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.
काही दिवसांपूर्वीच यासंदर्भातील सुनावणी संपली होती व विजय दर्डा यांच्यासह इतरही लोकांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. फक्त शिक्षेची सुनावणी उरली होती. छत्तीसगड येथील फतेपुर कोळशाच्या खाणीचे कंत्राट यवतमाळ येथील जे एल डी यवतमाळ एनर्जी या कंपनीला चुकीच्या पद्धतीने मिळवण्याचा ठपका विजय दर्डा यांच्यावर ठेवण्यात आला होता.
विशेष म्हणजे या छत्तीसगडमधील कोळसा घोटाळा प्रकरणांमध्ये अनेक पेज थ्री नेते व अधिकारी यांचा समावेश असून त्यातील काही जण अजूनही राजपूर तुरुंगात आहेत. विजय दर्डा खासदार असताना छत्तीसगड मधील कोळसा खाण वाटपात अनियमितता झाली म्हणून विशेष न्यायालयात याची सुनावणी सुरू होती. विजय दर्डा यांना व इतर आरोपींना देखील यामध्ये दोषी ठरवण्यात आले होते. याप्रकरणी सीबीआयने तपास केला होता