किसान विद्यालय शिंदखेडा येथे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय गणवेश वाटप
प्रतिनीधी गोपाल कोळी
शिंदखेडा तालुका येथे शिवसेनेचे(उ बा ठा) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने किसान विद्यालय शिंदखेडा येथे गरीब व गजू विद्यार्थ्यांना माजी जिल्हापरिषद सदस्य छोटू पाटील यांच्या कडून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व सर्जेराव पाटील यांच्या हस्ते शालेय गणवेश वाटप कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष कृ उ बा शिंदखेडा चे संचालक सर्जेराव पाटील होते कार्यक्रम प्रसंगी बोलताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची माहिती दिली विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एस पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिवसेनेने व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या आपल्या दातृत्वा बद्दल मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्रात घडलेल्या दुःखद घटनेचा विचार करता महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर्षी आपला वाढदिवस साजरा केला नाही परंतु गरजूंना शालेय गणवेश वाटप करून त्यांना शुभेच्छा देत आहोत कार्यक्रमाप्रसंगी शेतकरी बोर्डिंग चे संचालक वाल्मीक पाटील शिवसेनेचे तालुकाप्रमुख गिरीश देसले माजी जि प सदस्य छोटू पाटील माजी शहर प्रमुख नंदकिशोर पाटील, स्वामी समर्थ केंद्राचे संचालक प्रशांत भामरे, प्रवीण पाटील, एस ए वाडीले उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सागर देसले यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रावसाहेब बैसाने,जे डी भदाणे विशेष सहकार्य