जैविक खतांच्या वापराने उत्पन्नात मोठी वाढ होऊन खर्चातही बचत;कृभकोचे राज्य विपणन व्यवस्थापक बी एस चव्हाण:

*जैविक खतांच्या वापराने उत्पन्नात मोठी वाढ होऊन खर्चातही बचत;**कृभकोचे राज्य विपणन व्यवस्थापक बी एस चव्हाण:* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 यानिमित्त कृषक भारती को. ऑपरेटिव्ह लि. ( कृभको) मुंबईच्या वतीने नेर ता. जि. धुळे येथे कृभको खते प्रचार व प्रसार अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांचे चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी श्री चव्हाण म्हणाले की, रासायनिक खतांचा अतिवापराने शेती व पर्यावरणाची मोठी हानी होत असून खतांचा बरोबर जैविक खतांचा वापर केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ होते व खर्चातही बचत होते यावेळी कंपनीचे निवृत्त प्रबंधक श्री एन वाय साळुंखे यांनी रासायनिक खते वापर व कंपनीचे कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेर चे माजी सरपंच व उद्योजक शंकरराव खलाणे हे होते तसेच कृभको कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक डी एन सूर्यवंशी व इफको कंपनीचे व्यवस्थापक कलीम शेख, आर सी फर्टीलायझर्सचे मनोहर पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जानकी ऍग्रो सर्विसेस चे संचालक शरद शेठ यांनी केले तर आभार प्रदर्शन कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक उमेश महाले यांनी केले, यावेळी कंपनीच्या उत्पादनाच्या प्रचार व प्रसार व्हॅनचे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला परिसरातील नेर, भदाणे, अकलाड, खंडलाय, देऊर, नांद्रे, लोणखेडी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!