द्वितीय स्मृती दिना निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण
आज रोजी जिल्हा परिषद शाळा भवानीनगर (बामखेडा त.सा.) केंद्र सारंगखेडा येथे सौ .गौरी व राकेश बाविस्कर (सोनार) हल्ली मुक्काम पुणे .यांची मुलगी दिवंगत कु.अधिरा हिच्या द्वितीय स्मरणानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ,शैक्षणिक साहित्य (दप्तर ,पट्टी,बॉलपेन,पेन्सिल,खोडरबर,शार्पनर ,पाण्याची बॉटल इ.)व शालेय परिसरात(40 निमाची झाडे)वृक्षारोपण करुण श्रद्धांजली वाहण्यात आली .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भवानीनगर बामखेडा त.स.येथील सरपंच सौ. साधनाताई सखाराम पाटील या उपस्थित होत्या .आलेल्या मान्यवरांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमे समोर दीपप्रज्वलीत करून पूजन करण्यात आले.या नंतर दिवंगत कु.अधिरा हिस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ,गुलाबपुष्प देऊन शाळेतर्फे शाळेच्या मुख्यध्यापिका श्रीमती स्वाती सोनवणे मॅडम व शिक्षक संजय निकुंबे यांनी स्वागत केले.सदर कार्यक्रमात दिवंगत अधिरा या मुलीचे आई,वडील ,आजोबा, आपल्या मनोगतात म्हणाले कि,आमची अधिरा कायमस्वरूपी स्मरणात राहावी यासाठी समाजातील गोरगरिबांच्या मुलांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करून व वृक्षारोपण करून तिला श्रद्धांजली अर्पण करणार आहोत .या कार्यक्रमाला भवानीनगर बामखेडा त.सा.या गावाचे पोलीस पाटील श्री .सुभाष पवार,श्री सखारामभाई पाटील ,श्री हरसिंग पवार,वरुळ त.श.येथील नागरिक श्री .सुभाषदादा जाधव ,श्री .मोहनदादा जाधव,श्री .शेखर अहिरराव,श्री .विपुल जाधव , श्री .लक्ष्मण कपूर,श्री .नेहरू सोनवणे,श्री .सौरभ सोनार ,श्री .रवींद्र बाविस्कर श्री .राकेश बाविस्कर. सौ .मायाताई , सौ संगीताताई सौ गौरीताई,सौ आशाताई .या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला .सूत्रसंचालन शिक्षक संजय निकुंबे यांनी केले.आभार शाळेच्या मुख्यध्यापिका श्रीमती स्वाती सोनवणे मॅडम यांनी मानले.