लाखापूर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी…..
तळोदा तालुक्यातील लाखापुर (फॉ.) येथील माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती संयुक्त विद्यमाने कार्यक्रम साजरा करण्यात आला
याप्रसंगी सूत्रसंचालन विनोद राणे यांनी केले तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले अनिल भामरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी अनमोल मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याविषयी अनमोल माहिती दिली.
या कार्यक्रम प्रसंगी उपशिक्षक मंगल पावरा , सुवर्णा कोळी ,
वना नाईक , सागर पाडवी , विद्यार्थी उपस्थित होते