नेर परीसरात डोळ्यांच्या साथीने सारेच हैराण;ड्रॉप्स,गॉगलला वाढली मागणी:
नेर: धुळे तालुक्यातील नेरसह परीसरात डोळे येण्याच्या रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून,रुग्णांकडून विविध प्रतिजैविक ड्रॉप व गॉगल्स खरेदी करण्यावर भर देण्यात येत आहे.
त्यामुळे प्रतिजैविक ड्रॉप, गॉगल्सची चांगलीच मागणी वाढली असल्याचे चित्र दिसून येत आहे. लहान-मोठ्यांसोबतच विशेषतःशालेय विद्यार्थ्यांमध्ये ही साथ मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
डोळे हलके लाल होणे,डोळ्यातून पाणी येणे,खाज येणे, डोळ्यात चिकटपणा येणे,डोळ्यात वारंवार खाज येणे,त्याचबरोबर सर्दी,खोकला,ताप अशी डोळे येण्याची लक्षणे आहेत.साधारणपणे डोळे येण्याची लक्षणे एका डोळ्यात आधी दिसू लागतात, मग ती दुसऱ्या डोळ्यामध्येही प्रकट होत आहेत.
नेरसह परीसरात देखील डोळे येण्याचे कारणे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत तसेच साथ चालू असुन गावात देखील.व्हायरस पसरलेले आहेत.तसेच ओलाव्यामुळे संसर्ग बराच काळ शरीरात राहतो व आपल्याला वारंवार घाम येतो. म्हणून
त्यामुळे आपण आपला चेहरा पुसत राहतो,चेहरा पुसताना आपण डोळ्यांनाही हाताने स्पर्श करत असल्याने या सर्व कारणांमुळे संसर्ग पसरत असून,डोळ्यांची साथ वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये ही साथ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
नेत्रविकार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन डोळे येण्याचे प्रमाण वाढले;अशी घ्या काळजी. व
डोळे येण्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना सोशल मीडियावरही याबाबत घ्यावयाची काळजीबाबत विविध मेसेज येत असून, औषधनिर्माता तसेच मेडिकल स्टोअर्सधारकांकडून सोशल मीडियावर आपल्याकडे ड्रॉप्स उपलब्ध असल्याबाबतही मेसेज फॉरवर्ड करण्यात येत आहेत.तसेच त्यांच्याकडून विविध ड्रॉपचे स्टेटस ठेवण्यात येत असल्याचे चित्र आहे.
तसेच नेर येथील गावात गल्लोगलली डोळ्यांची साथ चालू असुन नागरीक बचाव करण्यासाठी गॉगल घालत आहेत.तसेच डॉक्टरांकडून तपासणी केली जाते आहे. तसेच
डोळे येणे या संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी घरातील इतर सदस्यांकडून संसर्ग झालेल्या व्यक्तीचे रुमाल,टॉवेल वापरणे टाळले जात असून,हात स्वच्छ धुणे,डोळ्यांना सारखे हात न लावणे यांसारखी काळजी घेण्यात येत आहे.
तसेच तर गॉगलला जास्तीत जास्त मागणी होत आहे कारण
सध्या डोळे येण्याचे प्रमाण वाढत असल्याने गॉगल दुकानदारांनाही सुगीचे दिवस आले असून, मोठ्या प्रमाणावर गॉगल खरेदी करण्यास प्राधान्य दिले जात आहे. एक गॉगल एकच व्यक्ती लावत असल्याने दुसरा वापरू शकत नसल्याने मोठ्या प्रमाणावर गॉगल खरेदी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. डोळे आलेल्या रुग्णांकडून नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन उपचार करून घेण्यास प्राधान्य दिले जात आहे. नेर प्रतिनिधि दिलीप साळुंखे