नेर शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री.रामभाऊ पाटील सर यांच्या कल्पनेतून व स्वखर्चातून विद्यार्थ्यांना मिळाला निवारा:
नेर: धुळे तालुक्यातील नेर येथे आज दिनांक ०२/०८/२०२३ रोजी नेर येथील नवीन जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती येथील विद्यार्थ्यांना ऊन, वारा व पाऊस यामुळे येणाऱ्या अडथळ्यास श्री रामभाऊ पाटील सर यांनी स्वखर्चातून व कल्पकतेने तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने दूर केले.
इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत असलेल्या या शाळेत तात्पुरती एकच वर्गखोली उपलब्ध असल्यामुळे तसेच नवीन इमारतीचे बांधकाम होई पर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून श्री रामभाऊ पाटील सर व श्री योगेश कोळी सर यांनी पालक सभा घेऊन यातून मार्ग काढला.यासाठी जवळपास् तीन महिन्यासाठी स्वखर्चातून मंडप टाकण्यात आला आहे.या मंडपाच्या सावली मध्ये विद्यार्थ्यांना बसण्यात अत्यंत आनंद झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून आले.
यासाठी ग्रामपंचायत सदस्य श्री दयाराम दादा चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य तथा अध्यक्ष श्री जीवन दादा भील,श्री कलीम दादा, श्री शिवाजी पाटील, श्री तुळशीराम साळवे, श्री शांताराम सावळे, श्री निलेश भदाणे, श्री विक्रम भदाणे, श्री कऱ्हाड दादा, श्री सचिन सूर्यवंशी (मॅनेजर), सौ कल्पनाताई शंखपाळ (अध्यक्ष नेर 4) सौ शोभाबाई पाटील, सौ चित्राबाई गायकवाड तसेच सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.