शिंदखेडा तालुक्यात शिक्षकांची ११४ पदे रिक्त जि.प. सदस्या सौ. सुनिता ताई सोनवणे यांची जि.प.शिक्षण समिती सभेत मागणी
प्रतिनिधी गोपाल कोळी
दोंडाईंचा . जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा सभापती शिक्षण सभापती महावीरसिंह रावल रावल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात जिल्हा परिषद सदस्य सुनिता सोनवणे यांनी जिल्हा परिषद गट धमाने या गटामध्ये सगळयात जास्त शिक्षकांची पद रिक्त आहेत. तर पुर्ण शिंदखेडा तालुक्यामध्ये एकुण ११४ शिक्षकांची पद रिक्त आहेत. त्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी. सदर रिक्त पदांची भरती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जि.प.सदस्या
सुनिता सोनवणे म्हणाल्या की, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती यांचा १५ वा वित्त आयोगाचा निधी आहे. या निधीतून काही प्रमाणामध्ये खर्च करून बेरोजगार असलेल्या बी. एड., डी. एड. पदवीधारक तरुणांना रिक्त जागेवर शिक्षक म्हणून तात्पुरती नियुक्ती देण्यात यावी.
एकट्या शिंदखेडा तालुक्यात ११४ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यात शिक्षणाचा पुर्णपणे बोजवारा उडाला आहे. जिल्हाभरात रिक्त पदांची एकुण संख्या मोठी असून यामुळे मुलांना शिक्षण कसे दिले जात असेल ही एक चिंतेची बाब आहे. ज्या शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. त्यासंदर्भात जि.प.ने शिक्षण समितीचा ठराव करून महाराष्ट्र शासनाला तत्काळ पाठवावा. एक महिन्याच्या आत ही रिक्त पदे भरली गेली पाहिजे अशी मागणी जि.प. सदस्या
सुनिता शानाभाऊ सोनवणे यांनी सभेत केली आहे .