.. महसूल सप्ताह निमित्त चिमठाणे येथील तलाठी कार्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला..तसेच चिमठाणे मंडळ भागातील महसूल विभागाशी निगडित विविध प्रलंबित कामे निकाली काढण्यात आली..अशी माहिती चिमठाणे सजाचे तलाठी श्री जे.व्ही .निकम यांनी दिली… चिमठाणे मंडळ भागातील भूविकास बँकेचे बोजे,आदेशांविहित कमी करण्यात आले..शेतकऱ्यांना सातबाराचे वाटप करण्यात आले…व तसेच महसूलाशी निगडित विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले..तसेच प्रलंबित असलेल्या सर्व फेरफार नोंदी निर्गमित करण्यात आली अशी विविध कामे महसूल सप्तहाच्या निमित्ताने करण्यात आली… कार्यक्रमाच्या ठिकाणी चिमठाणे मंडळ अधिकारी एस. एस मोरे,तलाठी चिमठाणे जे .व्ही निकम ,तलाठी तामथरे व्ही .व्ही माळी,तलाठी मुकटी एस .व्ही.सुरसे, तलाठी दराणे एस.डी. नादरगे,डी. डी, सी.बँक शाखाधिकारी पी.पी.तावडे ,तपासणी अधिकारी डी. व्ही .गांगुर्डे,सोसायटी सचिव भगवान पवार, चिमठाणे कोतवाल नाना कोळी,डी, डी सी बँक कोळी शिपाई ,झिंगा आप्पा, आदी उपस्थित होते…..
महसूल सप्ताह निमित्त चिमठाणे येथील तलाठी कार्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम
