गोंडगाव प्रकरणी अटक केलेल्या नराधम स्वप्निल पाटील ला फाशीची शिक्षा द्या – सकल मराठा समाजाच्या वतीने शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन
नराधमाला फाशी झालीच पाहिजे,या अत्याचारीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अश्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला
शिंदखेडा प्रतिनिधी भूषण पवार – गोंडगाव तालुका भडगाव या ठिकाणी अवघ्या नऊ वर्षाची चिमुकली कु कल्याणी वर अत्याचार करत तोंड दाबून दगडाने डोके ठेचून नराधमाने हत्या केली होती माणुसकीला काडी मा फासणारी घटनेबाबत शिंदखेडा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार शिंदखेडा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, स्वप्निल पाटील या नराधमाने खून केल्याची कबुली दिली आहे. नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि ही शिक्षा देशातील जनतेसमोर देण्यात यावी जेणेकरून पुढे या प्रकारचे कृत्य कोणी करणार नाही. या आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजातील माता-भगिनी व समाज बांधव उपस्थित होते. तसेच या घटनेचा सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला व तहसील कार्यालयात नराधमाच्या विरोधात महिला व पुरुषां द्वारे घोषणा देण्यात आल्या. सदर निवेदनातील मागणी लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.प्रसंगी विनायक पवार व महिला वर्गातून सायली मराठे यांनी मनोगत व्यक्त केले.