सुनिता गांगुर्डे यांची सामाजिक बांधिलकी ————————————————-———नाशिक(गुरुनाथ तिरपणकर)-संध्याकाळी नेहमी प्रमाणे सुनिता गांगुर्डे या शहरातील एका मध्यवर्ती एरीयातु जात असताना एक फोर व्हीलर गाडीने स्कुटीवरील एक महीला तिचे यजमान व मुलगा त्या रस्त्यावरून जात असताना स्कुटीला उडवून भरगाव वेगाने निघून गेली.सुनिता गांगुर्डे या फीरायला जात असतानाच हा अपघाताचा प्रकार त्यांच्या समोर घडला. बरेच लोक हे बघ्याची भुमिका घेऊन पुढे जात होते.मावळा संघटनेच्या अध्यक्षा सौ.सुनिता गांगुर्डे यांनी तत्परतेने त्या कुटंबाला रस्त्याच्या कडेला बसवले,स्कुटीवरील बाईला व मुलाला बरेच लागले होते.तात्काळ रिक्षा थांबवून त्यांना हाॅस्पिटल पोहचविले,व त्वरीत उपचार केले. आपणही समाजाचे काही देणं लागतो,या सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून सौ.सुनिता गांगुर्डे यांनी माणुसकीचे दर्शनच घडविले.कुठल्याही प्रकारचे फोटोसेशन न करता त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. ही खरी समाजसेविका असेच सुनिता गांगुर्डे याच्या बाबत म्हणावे लागेल.
सुनिता गांगुर्डे यांची सामाजिक बांधिलकी
