🙏 शहादा येथील श्री मच्छिंद्रनाथ गणेश मंडळाचा पाद्यपूजा सोहळा जल्लोषात संपन्न…
शहरातील प्रमुख मंडळापैकी एक, श्री मच्छिंद्रनाथ गणेश मित्र मंडळातर्फे प्रथमच दि. ४ ऑगस्ट रोजी पाद्यपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान संध्याकाळी ६:३० वाजता हिंगलाज माता मंदिरापासून ते मच्छिंद्रनाथ चौक पर्यंत वाजत – गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. पूजन झाल्यानंतर मंडळातर्फे जोरदार आतिषबाजी करण्यात आली. याप्रसंगी परिसरातील तमाम गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच महिलांच्या सहभागाणे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले असून गणेश उत्सवाची सर्वांनाच चाहूल लागल्याचे दिसून आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्वच सदस्यांनी मेहनत घेतली.