सावखेडा सिम ग्रामपंचायत झालेल्या अपहरण प्रकरणी यावल पंचायत समिती सदस्य शेखर पाटील उपोषण करणार

सावखेडा सिम ग्रामपंचायत झालेल्या अपहरण प्रकरणी यावल पंचायत समिती सदस्य शेखर पाटील उपोषण करणार मनवेल ता.यावल : तालुक्यातील सावखेडा सिम येथील ग्रामपंचायत मधील पंधरावा वित्त आयोगात तसेच अनेक विकास कामात झालेल्या निधी अपहरण प्रकरणात संबंधितावर कार्यवाही होत नसल्याने काँग्रेसचे गटनेता तथा पंचायत समिती सदस्य शेखर सोपान पाटील दिनांक 14 ऑगस्ट पासून यावल पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्यांसह उपोषणास बसणार आहेत याबाबतचे पत्र शेखर पाटील यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचे सहसंबंधितांना दिलेले आहे पत्रात म्हटले आहे की सावखेडे सिम ग्रामपंचायत मध्ये सहा जानेवारी तेवीस पंधरावा वित्त आयोग जाचे अनियमित चौकशी 15 फेब्रुवारी 23 ग्रामनिधी व ग्राम पाणीपुरवठा निधी अपहार प्रकरण तसेच 23 जून 2023 ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत यांनी ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या विकास कामांच्या चौकशीचा अर्ज आणि दहा जुलै 2023 15 व्या वित्त आयोगाच्या कामांच्या प्रतवारी चौकशी करण्याबाबतचे अर्ज दिलेले असून यात झालेल्या निधीचा अद्यापही चौकशी अगर कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने उपोषण करण्यात येणार आहे सन 2020 के सन 2023 या काळात सरपंच सदस्य यांनी अनेक वेगवेगळ्या विकास कामात येणाऱ्या निधीचा वापर करून संबंधित ग्रामसेवकाने ठराविक ठेकेदारासच कामे देऊन कामे केलेली आहेत यात होणाऱ्या निधीचा अपहार झालेला आहे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज दाखल करून त्याद्वारे माहिती मिळवली आहे माहितीच्या नुसार दहा महिन्यापासून दोशींवर काही एक कार्यवाही झालेली नाही या सर्व बाबींचा विचार करीत शेखर पाटील व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य 14 अगस्त पासून सकाळी दहा वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत कुपोषणास त्यानंतर त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याला जबाबदार संबंधित ग्रामपंचायत व अधिकारी राहतील असे नमूद करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!