*सोशल मीडियाच्या माध्यमातुन चोरी झालेली पत्रकाराची मोटरसायकल परत मिळाली…चार दिवसांनंतर शहादा परिसरात बेवारस स्थितीत दिसली गाडी…शहादा पोलीसांनी मोटरसायकल ताब्यात घेत,मुळ फिर्यादीला गाडी मिळाल्याचा केला फोन..

*सोशल मीडियाच्या माध्यमातुन चोरी झालेली पत्रकाराची मोटरसायकल परत मिळाली…**चार दिवसांनंतर शहादा परिसरात बेवारस स्थितीत दिसली गाडी…**शहादा पोलीसांनी मोटरसायकल ताब्यात घेत,मुळ फिर्यादीला गाडी मिळाल्याचा केला फोन…-**दोंडाईचा-* येथील सौरभ मंगल कार्यालय मागील शिववंदना अपार्टमेंटमध्ये शुक्रवार दिनांक ४ जुलै रोजी पहाटे येथील रहिवासी तथा पत्रकार श्री समाधान संतोष ठाकरे यांची हिरो कंपनीची लाल-ब्लॅक कलरची मोटरसायकल एम.एच.३९ एस.४१४३ ही चोरीला गेल्यावर सर्वप्रथम विविध सोशल मिडिया मार्फत जनतेला कुठे गाडी दिसल्यास मुळ मालकाला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते.त्याअनुषंगाने आज मोटरसायकल चोरी झालेच्या चार दिवसांनी शहादा परिसरात पोलीसांच्या खबऱ्यांना सदरील वरील गाडी आहे त्या परिस्थितीत बेवारस स्थितीत दिसली, त्यांनी लगेच स्थानिक शहादा पोलीस स्टेशनला संपर्क साधत,मोटरसायकलचे फोटो व नंबर दिला.त्यानुसार शहादा पोलीसांनी दोघी तिघी जिल्ह्यातील पोलिस स्टेशनशी संपर्क साधत,गाडी हरवलेल्या मुळ मालकाला माहिती देत, मोटरसायकल ताब्यात घेण्यास बोलविले व आज दिनांक ७ जुलै सोमवार रोजी रात्री ९.०० वाजता समाधान ठाकरे यांना मोटरसायकल ताब्यात मिळाली आहे.म्हणुन चोरी झालेली पत्रकाराची मोटरसायकल परत मिळाल्यावर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला व सोबत देवाधिदेव भोलेनाथ भगवान,सोशल मिडिया भगवान,व शहादा पोलीसांचे मनातल्या मनात आभार मानत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!