*पंचायत समिती नंदुरबार कार्यालयातील दोन कनिष्ठ सहायक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात*
लोकसेवक यांचीअंतर जिल्हा बदली झाल्यानंतर त्यांचे पगार वाढ व सातव्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते काढून बिल मंजूर करून देण्याचे मोबदल्यात यातील आलोसे क्रमांक ०१) दादाभाई पान पाटील व आलोसे क्रमांक ०२) सुखदेव वाघ कनिष्ठ सहायक पंचायत समिती नंदुरबार यांनी आज ०८ ऑगस्ट २०२३ रोजी तक्रारदार कडून हजार ते दोन हजार मोघम स्वरूपात लाचेची मागणी केली. त्यानंतर एसीबीच्या सापळा कारवाही दरम्यान मागणी केलेली लाचेची रक्कम पंचायत समिती आवारातील स्वीकारल्यानंतर त्यांना पंच व साक्षीदारसमक्ष पकडण्यात आले तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पुढील कारवाई सुरू आहे.सदर कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे – वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, श्री. माधव रेड्डी अपर पोलीस अधीक्षक, श्री. नरेंद्र पवार वाचक पोलीस उप अधीक्षक नाशिक परिक्षेत्र यांचे मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी राकेश चौधरी पोलीस उप अधीक्षक, सापळा अधिकारी समाधान वाघ, सापळा कार्यवाही पथक पोहवा / विजय ठाकरे, पोना/ देवराम गावित,पोना / संदीप नावाडेकर, पोना / अमोल मराठे व पोना / मनोज अहिरे सर्व नेम ला.प्र.वि. नंदुरबार सापळा मदत पथक माधवी एस. वाघ पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार पोहवा / विलास पाटील व मपोना / ज्योती पाटील सर्व नेम अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार यांच्या पथकाने केली आहे.