पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, सेवक कल्याण निधीच्या अध्यक्षपदी डॉ.तुषार शितोळे
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्थेची सन २०२२-२३ ची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.१४.०७.२०२३ रोजी टिळक स्मारक येथे पार पडली यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवर तसेच त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींच्या एकमताने शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर चे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांची पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, सेवक कल्याण निधीच्या सन २०२३ ते २०२८ या वर्षासाठी संचालक मंडळावर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली .
डॉ.शितोळे यांना २९ वर्षाचा प्रदीर्घ असा अध्यापनाचा अनुभव आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक म्हणून, केंद्र कार्यवाहक बहिःशाल शिक्षण मंडळ,सदस्य-भूगोल अभ्यास मंडळ पुणे विद्यापीठ, अविष्कार स्पर्धेत राज्यस्तरापर्यंत मजल अशी अनेक उल्लेखनीय कामगिरी करीत त्यांना विविध पुरस्कार त्यामध्ये उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी विद्यापीठ स्तरीय पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार व राष्ट्रीय पातळीवरील इंदिरागांधी राष्ट्रीय पुरस्कार, उत्कृष्ट विद्यार्थी कल्याण अधिकारी, विद्यार्थी कल्याण मंडळ, पुणे विद्यापीठ, उत्कृष्ट जिल्हा समन्वयक, विद्यार्थी कल्याण मंडळ, पुणे विद्यापीठ ,आदर्श शिक्षक पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना भेटले आहेत.
या निवडीबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्थेचे मानद सचिव ऍड.संदीप कदम, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे,उपसचिव एल.एम.पवार, खजिनदार ऍड मोहनराव देशमुख त्याचप्रमाणे आजी माजी विद्यार्थी व सहकारी प्राध्यापकांनी प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांचे अभिनंदन केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.