आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी जननायक बिरसा मुंडा एकलव्य समशेर सिंग पारधी,छ. शिवाजी महाराज. व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा अभिवादन करण्यात आले
मालपुर प्रतिनिधी गोपाल कोळी
मालपुर ता. शिंदखेडा येथे आज संध्याकाळी जागतिक आदिवासी दिना निमित्त आदिवासी जननायक बिरसा मुंडा एकलव्य समशेर सिंग पारधी छत्रपत्री शिवाजी महाराज व भारतरत्न डाँ.बाबाबासाहे आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यांत आले.
सदरच्या कार्यक्रमास दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्रीराम पवार साहेब यांनी प्रतिमांना अभिवादन करून मनोगत व्यक्त करताना आदिवासी तरुण पिढीला शैक्षणिक व सामाजिक संदेश दिला तसेच आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने कार्यक्रममाचे आयोजन करण्यांत आले होते . महासंघाचे शाखा मालपुरचे अध्यक्ष वना मंगल पारधी यांच्या वतीने दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांचा सत्कार करण्यात आला सदरच्या कार्यक्रमास ग्रामपंचायत मालपुर चे उपसरपंच भारतीबाई वाडीले माजी सरपंच हेमराज नाना पाटील तसेच माजी सरपंच विरेंद्र गोसावी माजी सरपंच लक्ष्मण पानपाटील पोलीस पाटील बापु बागुल बळीराम भाऊ वाडिले व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष ठाकरे सर यांनी केले