जळगाव : जळगावातील एका मुलीच्या खून प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केल्याप्रकरणी जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना अज्ञातांनी जबर मारहाण केली. हा हल्ला आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप संबंधित मारहाण झालेल्या पत्रकाराने केला आहे. या पूर्वी देखील संदीप महाजन यांना मारण्याची धमकी देणाऱ्या आमदार पाटील यांची व्हॉईस क्लिप ही व्हायरल झाली होती. यानंतर त्यांना ही मारहाण झाली आहे. दरम्यान, या घटनेचा पत्रकारिता क्षेत्रातून निषेध केला जात आहे. या मारहाणीत संदीप महाजन जखमी झाले असून त्यांनी या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.शिंदे गटाच्या आमदाराविरोधात बातमी दिल्याने जळगाव जिल्ह्यात एका पत्रकाराला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. आमदाराच्या या दादागिरीचा पत्रकारिता क्षेत्रातून निषेध केला जात
Related Posts
नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागातील मोठा मासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला
नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागातील मोठा मासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला. प्रतिनिधी = नरेश शिंदे नवापूर शहरात जिल्हा परिषदेची शाळा…
पंचायत समिती नंदुरबार कार्यालयातील दोन कनिष्ठ सहायक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
*पंचायत समिती नंदुरबार कार्यालयातील दोन कनिष्ठ सहायक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात* लोकसेवक यांचीअंतर जिल्हा बदली झाल्यानंतर त्यांचे पगार वाढ…
शेतीच्या वादातून झालेल्या तुफान हाणामारीत 2 जणांचा मृत्यू ५ जण जखमी, परस्परा विरुद्ध गुन्हा दाखल
जिल्हा प्रतिनिधी =नरेश शिंदे शहादा, ता. 27: मलगाव ता. शहादा शिवारातील पिपल्यापाडा येथे शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन गटात तुफान…