शिरपुर तालुक्यातील गदडदेव येथे जागदिक आदिवासी दिवस साजरा .

शिरपुर तालुक्यातील गदडदेव येथे जागदिक आदिवासी दिवस साजरा …बोराडी:- प्रतीनिधी:- शिरपुर तालुक्यातील व सातपुडा पायथ्याशी वसलेले गदडदेव येथे विर एकलव्य संघटना च्या वतीने जल्लोषात आदिवासी दिवस साजरा करण्यात आला तसेच अध्यक्ष स्थानी सरपंच आत्माराम आहिरे होते तसेच बिरसा ब्रिग्रेडचे धुळे जिल्हा सहकार्य अध्यक्ष रोहिदास पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले मनोगात संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी १९९४ पासुन ९ आॅगस्ट हा जागदिक आदिवासी दिवस साजरा करण्याची घोषना केली तेव्हा पासुन ९ आॅगष्ट हा जागदिक आदिवासी दिवस म्हणुन जगभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तसेच आदिवासी जमात ही स्वतंत्र होती व आहे आदिवासींचा धर्म, वंश परंपरा,चालीरीती ह्या स्वतंत्र आहेत म्हणजेच आदिवांची संस्कृती वेगळी आहे तो जंगलाचा राजा म्हणुनच ओळखला जातो वृक्षवल्ली आम्हा सोयरे ही भावना पूर्वांपर आपल्यामध्ये रूजलेली आहे त्या मुळे आपला इतरांच्या प्रचलित धर्म वा वर्णव्यवस्थेशी काही एक संबध नाही पाडवी यांनी माहिती दिली .. आदिवासी देवदेवतांच्या घोषणेने परीसर दणाणुन टाकला यावेळी गदडदेवचे प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री.आत्माराम अहिरे बिरसा ब्रिग्रेडचे धुळे जिल्हा सहकार्य अध्यक्ष श्री. रोहिदास पाडवी विर एकलव्य संघटनेचे शाखा प्रमुख व जेष्ट समाजसेव शिवदास भिल महिला शाखा प्रमुख कस्तुराबाई बागुल सचिव पिंटु भिल खजिनदार दुलसिंग भिल सदस्स आण्णा भिल , राज भिल, नारायण बागुल, शांतीलाल पटले ,ताराचंद ठाकरे, सखाराम पाडवी, किलसिंग मोते,तुळशिराम चौव्हाण, दिलवर(दादु) पाडवी, दिलवर (दिवी) पाडवी, दिव्या आॅटो पार्टचे मालक दिपक सोनवणे असे बहुसंख्खेने समाज बांधव उपस्थीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!