धुळे लोकसभा मतदार संघाची बैठक काँग्रेसचे पक्ष निरीक्षक वसंत पुरके यांची उपस्थिती
प्रतिनिधी गोपाल कोळी
धुळे ता. धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले आणि वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात निरीक्षक व समन्वयक नियुक्त केले आहेत. आगामी काळात पक्ष संघटन आणि निवडणूक नियोजनाबाबत लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील तालुका / ब्लॉक अध्यक्ष, आजी माजी आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी, पक्षाच्या विविध आघाड्या आणि सेलचे पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधून पक्षाची सद्याची स्थिती, भविष्यातील मोर्चेबांधणी आणि पक्ष संघटन वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत प्रदेश काँग्रेसने प्रत्येक मतदार संघातील अहवाल मागविले आहेत. त्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक, ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मा. प्रा. वसंत पुरके साहेब , प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, आ. कुणाल बाबा पाटील आणि समन्वयक माजी मंत्री डॉ शोभाताई बच्छाव
माजी खासदार बापूसाहेब चौरे, प्रदेश सचिव, माजी आमदार श्री डी एस अहिरे , प्रदेश सचिव युवराज करनकाळ, प्रदेश सचिव रणजित पावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १३ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १ वाजता काँग्रेस भवन, धुळे येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
धुळे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे माजी खासदार/आमदार, प्रमुख नेते, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक/तालुका अध्यक्ष, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी, विविध आघाडी, सेल अध्यक्ष, पदाधिकारी यांनी या महत्वपूर्ण बैठकीत उपस्थित राहावे असे आवाहन धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष *शामकांत सनेर नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ अनिल भामरे मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एजाज बेग अजीज बेग यांनी केले आहे.