उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा १५ आँगस्ट २०२३ रोजी रेल्वे रोको आंदोलनाला रेल्वे प्रशासनाच्या अधिका-यांच्या विनंती मुळे तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती

मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा १५ आँगस्ट २०२३ रोजी रेल्वे रोको आंदोलनाला रेल्वे प्रशासनाच्या अधिका-यांच्या विनंती मुळे तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती
दोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळी
दिनांक २३/०७/२०१८ रोजी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली दाऊळ, मंदाणे, झोतवाडे, शेंदवाडे,साहुर, तावखेडा प्र. न. नवे कोळदे, जुने कोळदे, लंघाणे व दोंडाईचा येथील जुने शहादा रोडवरील नागरिकांन व गावकऱ्यांनी दोंडाईचा रेल्वे स्टेशन येथे नवजिवन एक्स्प्रेस रेल्वे समोर बसून आंदोलन करण्यात आले होते कि डबल पटरी रेल्वे लाईन झाल्या मुळे दाऊळ रस्त्यावरील रेल्वे गेट दर १५/२० मिनीटाने बंद होत असते त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना व प्रवाशांना खूप त्रास होत असतो शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा वेळेत जात नाहीत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच आजारी रुग्णांना देखील दवाखान्यात घेऊन जाताना उशिर झाल्यामुळे रुग्णांना आपला जिव गमवावा लागला आहे त्यावेळी रेल्वे प्रशासनाने आश्वासन दिले होते की लवकरच उड्डाण पूल किंवा भुयारी मार्ग तयार करून त्यावर शिंदखेडा कडे जाणारा रस्ता व दाऊळ रस्त्यावर उड्डाण पुलाचे काम चालू झाले होते परंतु दाऊळ रस्त्यावरील उड्डाण पुलाचे काम बंद पडले असल्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना जास्तचा त्रास होत आहे व शिंदखेडा रस्त्यावरील उड्डाण पुलाचे काम चालू असुन प्रयायी रस्ता अत्यंत खराब झाला होता म्हणून एका युवकाचा मृत्यू झाला त्यामुळे प्रवासी व नागरीकांना मनात रेल्वे प्रशासनावर त्रिव नाराजी व्यक्त केली जात असल्याने व उड्डाण पूल बांधकाम ठेकेदार त्या वेळी दुर्लक्ष करत असल्याने दिनांक २३/०७/२३ रोजी बाम्हणे रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पूलला लागुन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले व मा. अप्पर तहसीलदार साहेब दोंडाईचा यांना निवेदन दिले की बाम्हणे रस्त्यावरील उड्डाण पूल लगत प्रयायी रस्त्याचे तात्काळ दुरुस्ती करून डांबरीकरण करुन ध्यावे व दाऊळ रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाचे काम तात्काळ चालु करावे किंवा अमरावती नदी जवळुन तात्पुरत्या स्वरूपात भुयारी मार्ग तयार करून द्यावा अन्यथा दिनांक १५ आॅगस्ट २०२३ वार मंगळवार स्वातंत्र्य रोजी मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या व महाविकास आघाडीच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन केले जाईल त्याविषयावर आज दिनांक ११ ऑगस्ट २०२३ वार शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता दोंडाईचा येथे रेल्वे प्रशासनाचे अधिकारी श्री राजेश कुमार रंजन ADEN नंदुरबार, श्री विजय शिरसाठ IOW नंदुरबार, श्री शर्मा साहेब TI नंदुरबार, श्री पांडे साहेब IPT/RPI, श्री बांबरे साहेब GPI/API नंदुरबार, महेंद्र पाटील साहेब SSEP/WAY दोंडाईचा यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या जवळ विनंती केली की दिनांक १५/०८/२०२३ रोजी आपण केलेले आंदोलनाचे आयोजनाला स्थगिती देऊन आम्हाला १ महिन्याची मुदत द्यावी कारण कि दाऊळ रस्त्यावर उड्डाण पूल रद्द करुन भुयारी मार्ग रस्ता तयार करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी साहेब धुळे यांच्या कडे फाईल तयार करून परवानगी घेण्यासाठी पाठवली आहे तसे फाईल दाखवल्या मुळे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी त्यांना एक महिन्याची मुदत दिली आहे की आपण ह्या एक मिहिन्यात भुयारी मार्ग तयार करण्याचे काम मार्गी लावा अन्यथा एक महिन्यानंतर रेल्वे रोको आंदोलन केले जाईल असे ठामपणे सांगितले व आता दिनांक १५/०८/२०२३ रोजी होणाऱ्या रेल्वे रोको आंदोलनाला स्थगिती दिली आहे त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, उपशहरप्रमुख राज ढोले, मनोज (बापु) परदेशी, नरेंद्र धात्रक,शानाभाऊ धनगर, प्रसाद चौधरी सह अनेक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित व रेल्वे प्रशासनाचे अधिकारी राजेश कुमार रंजन, विजय शिरसाठ, शर्मा साहेब,पांडे साहेब,बांबर साहेब महेंद्र पाटील व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!