पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याबाबत हल्लेखोर व त्यांच्या कथित सुञधारांवर ‘पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी व या घटनेचा निषेधार्थ शहादा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. याबाबत शहादा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बागले व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तहसीलदार दीपक गिरासे व पोलिस निरीक्षक शिवाजीराव बुधवंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले.निवेदनाचा आशय असा, पाचोरा (जि. जळगाव) येथील पत्रकार संदीप महाजन रेल्वे आंदोलनाची बातमी कव्हर करून घरी परतत असतांना काही गुंडांच्या टोळक्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. ज्या चौकात हल्ला झाला तो चौक पत्रकार महाजन यांच्या स्वातंत्र्यसैनिक वडीलांच्या नावाने ओळखला जातो.येथेच त्यांना लाथा-बुक्क्यांनी जमिनीवर पाडुन बेदम मारहाण केली. या मारहाणीत महाजन गंभीर जखमी झाले आहेत. ही मारहाण आ. किशोर पाटील यांनीच त्यांच्या गुंडांकरवी केल्याची तक्रार महाजन यांनी पाचोरा पोलिसांत दिली आहे. जर लोकप्रतिनिधींकडून अशा घटनांना मूर्त स्वरूप दिले जात असेल तर निश्चीतच माध्यम स्वातंत्र्य धोक्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. सत्य बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर सध्या अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात सातत्याने घडत असुन आम्ही त्याचा निषेध व्यक्त करत आहोत.आम्ही समस्त पत्रकार या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत.महाजन यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांवर व त्यांच्या मुख्य सुञधारांवर मुख्यमंत्री महोदय व गृहमंत्र्यांनी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कठोर कारवाई करावी. अशी मागणी या निवेदनादनाद्वारे आम्ही – समस्त पत्रकार करत आहोत.निवेदनावर अध्यक्ष नरेंद्र बागले, सचिव कमलेश पटेल, उपाध्यक्ष दिनेश पवार, किरण सोनार,रमेश पाटील, संजय पाटील, सहसचिव गिरधर मोरे, मनोज बिरारी, कार्याध्यक्ष अंबालाल पाटील, धनराज गोसावी,सुमित गिरासे, रघुनाथ बेलदार, सलाउद्दीन लोहार, राधेश्याम कुलथे, जगन ठाकरे, राजू मंसूरी आदींची स्वाक्षरी आहे.
Related Posts
गणेश उत्सव निमित्त नेर येथे पोलीस प्रशासनाकडून रुट मार्च
*नेर:* *गणेश उत्सव निमित्त नेर येथे पोलीस प्रशासनाकडून रुट मार्च* *नेर:* धुळे तालुक्यातील गणेश उत्सव निमित्त नेर,कुसुंबा येथे पोलीस प्रशासनाकडून…
पत्रकाराला भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण, गुन्हा दाखल
जळगाव : जळगावातील एका मुलीच्या खून प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केल्याप्रकरणी जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना अज्ञातांनी जबर…
शिंदखेडा तालुक्यात शिक्षकांची ११४ पदे रिक्त जि.प. सदस्या सौ. सुनिता ताई सोनवणे यांची जि.प.शिक्षण समिती सभेत मागणी
शिंदखेडा तालुक्यात शिक्षकांची ११४ पदे रिक्त जि.प. सदस्या सौ. सुनिता ताई सोनवणे यांची जि.प.शिक्षण समिती सभेत मागणीप्रतिनिधी गोपाल कोळीदोंडाईंचा .…