व्यायामशाळा व बास्केटबॉल कोर्ट बांधकाम अनुदानाचा गैरवापर करणाऱ्या अग्रवाल एज्युकेशन फाउंडेशन संस्थेवर कारवाई करा- राजेश्वर सामुद्रे (जिल्हाध्यक्ष, मनसे)

*व्यायामशाळा व बास्केटबॉल कोर्ट बांधकाम अनुदानाचा गैरवापर करणाऱ्या अग्रवाल एज्युकेशन फाउंडेशन संस्थेवर कारवाई करा- राजेश्वर सामुद्रे (जिल्हाध्यक्ष, मनसे)* शहादा- येथील अग्रवाल एज्युकेशन फाउंडेशन संस्थेने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा अनुदानाचा गैरवापर केल्या बाबत निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांनी निवेदन दिले. निवेदनाचा आशय असा की, दि. २१/०४/२०२३ रोजी मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे अग्रवाल एज्युकेशन फाउंडेशन संस्थेला दिलेल्या अनुदानाची चौकशी करून कारवाई करणे बाबत निवेदन दिले होते, तक्रारी निवेदनात म्हटले होते की, अग्रवाल एज्युकेशन फाउंडेशन संस्थेने व्यायामशाळेचे बांधकाम केलेले नाही, बास्केटबॉल कोर्ट शालेय इमारतीच्या पेसेज मध्येच पेवर ब्लॉक्स बसवून शाळेच्या इमारतीच्या भिंतीला बास्केट्स अटकविन्यात आले आहे, असे कोणत्याही प्रकारे नियमानुसार बांधकाम नाही, क्रीडांगण समपातळीसाठी पुरेसे क्रीडांगण उपलब्ध नाही. तरी देखील अनुदान दिले गेले म्हणून संस्थेने नियमानुसार अनुदानाची रक्कम सव्याज शासनास परत करावी व योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. मनसे जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांच्या तक्रारीवरून, दि. २५/०४/२०२३ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी, नंदुरबार यांच्या पत्रात अग्रवाल एज्युकेशन फाउंडेशन, शहादा संचलित अचिव्हर हाईट्स इंटर नॅशनल स्कूल, शहादा ता. शहादा.जिल्हा नंदुरबार संस्थेच्या अध्यक्ष/ सचिव यांना दिलेल्या पत्रात म्हटल्यानुसार संस्थेला २०१३-१४ मध्ये व्यायामशाळा बांधकाम करणेसाठी २ लाख रु., २०१३-१४ मध्ये क्रीडांगण समपातळी तयार करणेसाठी १ लाख ६५हजार रु. तर २०१५-१६ मध्ये बास्केटबॉल कोर्ट मैदान तयार करण्यासाठी ४ लाख रु. असे अनुदान देण्यात आले आहे. संस्थेच्या वतीने करण्यात आलेले करण्यात आलेले बास्केटबॉल कोर्टाचे मैदान व व्यायामशाळा बांधकामाचे खर्चाचे अंदाजपत्रक व आराखड्यानुसार पूर्ण केलेल्या कामाचे विनियोग प्रमाणपत्र, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, लेखाविवरणपत्र (ऑडीट), कामाचे फोटोसह या कार्यालयात ०८ दिवसाच्या आत अहवाल सादर करावा. सदरचा अहवाल आपण या कार्यालयास सादर न केल्यास आपले काहीही एक म्हणणे नाही असे गृहीत धरून आपल्या संस्थेस वितरीत करण्यात आलेला निधी शासनाचे प्रचलित दरानुसार रु. १८% दराने सव्याज वसुलीची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असे आदेशीत पत्र जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिले होते. परंतु जिल्हा क्रीडा अधिकारी, नंदुरबार यांनी पत्र देवून ३ महिने उलटूनही यावर आजपर्यंत कार्यवाही केलेली नाही, ८ दिवसाच्या आत अहवाल सादर करा अन्यथा सव्याज वसुलीची कारवाईच्या आदेशाला संस्थेने केराच्या टोपलीत टाकलेले दिसत आहे. प्रत्यक्षात आजपर्यंत सदर संस्थेने व्यायामशाळेचे आणि बास्केटबॉल कोर्टाचे बांधकाम केले नाही तरीही जिल्हा क्रीडा अधिकारी कारवाई का करत नाही? असा प्रश्न उभा राहिला आहे. तरी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती की, अग्रवाल एज्युकेशन फाउंडेशन यांनी क्रीडा विभागाच्या अनुदानाचा गैरवापर केला आहे, विहित नियामनुसार बांधकाम केलेले नाही, म्हणूनच यांच्यावर कारवाई करणायत यावी अशी विनंती. अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे, शहर अध्यक्ष सुहास (दादू) पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!