चोपडा येथे अन्नत्याग सत्याग्रह उपोषणला जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांची भेट
यावल (प्रतिनिधी ) चोपडा येथील तहसिल कार्यलया जवळ गोरगावले येथील समाजसेवक जगन्नाथ टी. बावीस्कर यांचा चोपडा तालुक्यातील सह जिल्हाभरातील टोकरे कोळी जातप्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज संबंधित विभागाकडे प्रलंबित आहेत त्यांना टोकरे कोळी (एस.टी) चे दाखले मिळाले पाहिजे म्हणून मा.जगन्नाथ टी.बावीस्कर यांचा अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला आदिवासी कोळी संघर्ष समितीचे प्रदेशउपाध्यक्ष व जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी भेट दिली.
चोपडा प्रांत कार्यलयातून टोकरे कोळी समाज बांधवांना जात प्रमाणापत्र मिळण्यासाठी संबंधात अधिकारी त्रास देत असल्यामुळे चोपडा तहसिल कार्यलय समोर दि.९ आँगष्ट २३ पासून अन्नत्याग सत्याग्रह आदोलन सूरु आहे याला समाज बांधवा कडुन जाहिर पाठिंबा मिळत आहे मात्र निगरगठ्ठ प्रशासनाला जागे होत नसल्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी १४ आँगष्ट रोजी चोपडा येथे आदीवाशी कोळी समाज बांधवांनी आयोजीत करण्यात आला आहे यासाठी यावल तालुक्यातील समाज बांधव उपस्थित राहणार असल्याचे प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी सागीतले.
यावेळी यावल येथील पत्रकार भरत कोळी , गोकुळ कोळी सह समाज बांधव उपस्थित होते.