*कृषि दुतांनी केले मातीची सुपिकता टिकविण्याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन*प्रतिनिधी गोपाल कोळीदोंडाईचा ता. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित विकास रत्न सरकार साहेब रावल कृषी महाविद्यालय दोंडाईचा येथील कृषि पदवी (बी. एस. सी कृषि) अभ्यास क्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कृषि कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत मौजे गिधाडे येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कृषी दुतांनी आज ग्राम विकास अधिकारी कार्यालयात “मेरा देश मेरी मिट्टी” या कार्यक्रमाचा शपथविधी घेण्यात आला व शेतकऱ्यांना मातीचे महत्व व सुपीकता कशी टिकवावी यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री. अनिल लक्ष्मण झाल्टे साहेब व सरपंच श्रीमती अक्काबाई नारायण वाघ व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. बी. राजपूत सर ,उपप्राचार्य आर बी पाटील सर तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. विवेक चव्हाण सर व कार्यक्रम अधिकारी प्रा. इंद्रजीत गिरासे सर व प्रा. शरद भोपळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
Related Posts
जिल्हास्तरीय गुणगौरव सत्काराचा कार्यक्रम. वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना नंदुरबार
जिल्हास्तरीय गुणगौरव सत्काराचा कार्यक्रम. वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना नंदुरबारजिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठकीत सर्वानुमते निर्णय घेतल्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सन 2021 –…
कणकवली येथील एस्.एम्.हायस्कुलच्या१९७६च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा उत्साहात साजरा
कणकवली येथील एस्.एम्.हायस्कुलच्या१९७६च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा उत्साहात साजरा ———————————————————–मालवण(गुरुनाथ तिरपणकर)-“अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती”या गतकाळाच्या स्मृतींना उजाळा…
नेर येथे आरोग्य केंद्रात चार खाटांचे जि.प.सदस्य आनंदराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
*नेर येथे आरोग्य केंद्रात चार खाटांचे जि.प.सदस्य आनंदराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन:* *जि.प.सदस्य आनंदराव पाटील यांचे विशेष प्रयत्न* *नेर:* धुळे…