उपजिल्हा रुग्णालयाच्या गेट जवळच गोळ्यांचे पाकिटे जाळण्याची वेळ का

*उपजिल्हा रुग्णालयाच्या गेट जवळच गोळ्यांचे पाकिटे जाळण्याची वेळ का*दोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळी दोंडाईचा ता. उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य ओपीडीच्या गेट जवळच कचरा मध्ये रुग्णांच्या उपचारात वापराच्या गोळ्या,टॅबलेट असलेल्या पाकीटे व त्याचे खोके जाळल्याचे आज निदर्शनास आले आहे. यावरून उपजिल्हा रुग्णालयाचा अनागोंदी कार्यभार उघड होत आहे शासकीय आरोग्य विभाग रुग्णांच्या उपचारासाठी गोळ्या औषधी खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन रुग्णाचे आरोग्य चांगले होण्यासाठी मोफत उपचार दिला जातो त्यामध्ये दर्जेदार गोळ्या औषधी मिळाव्यात म्हणून औषधे खरेदी केली जातात. परंतु त्या गोळ्या औषधी रुग्णांना वेळेवर मिळतात का? का?औषधी औषध भांडारातच एक्सपायरी डेट संपेपर्यंत पडून राहतात असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आज मुख्य गेट जवळ कचरा मध्ये जाळलेल्या गोळ्यांचा वापर कोण – कोणत्या आजारावर होत होता. या गोळ्या शिल्लक असुनही रुग्णांच्या उपचारावर वापरल्या का? नाहीत गोळ्या खराब झाल्या होत्या का? म्हणून तर गोळ्या जाळण्याची वेळ उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचारींवर आली नाही ना? उपजिल्हा रुग्णालयाचा वैद्यकीय जैवि कचरा गोळा करण्यासाठी प्रदुषण मंडळाची कचरा गोळा करण्यासाठी कचरा गाडी येते त्यामध्ये खराब वापर झालेले इन्जेक्शन खाली सलाईन बाटल्या सर्व वैद्यकीय जैविक कचरा गोळा करुन त्या गाडी मध्ये टाकला जातो त्यानंतर त्यावर प्रक्रिया करुन तो कचरा नष्ट केला जातो त्यामुळे आरोग्य विभागाच्या कोणत्याही शासकीय रुग्णालयात जैविक कचरा राहत नाही असेल तर बाहेरील पालापाचोळा हा पालापाचोळा जाळण्यास हरकत नाही परंतु त्यासोबत गोळ्या जाळणे टाळाव्यात हा गंभीर प्रकार आहे जर गोळ्या खराब झाल्या असतील तर त्या जैविक कचरा गाडीत का? टाकल्या नाहीत गोळ्या जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणजे रुग्णांना गोळ्या औषधी वाटप करण्यापेक्षा विल्हेवाट, जाळपोळ जास्त केली जाते का? अशी शंका येते या गंभीर प्रकरणाकडे वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक लक्ष देतील का? या गोळ्या कुणी जाळल्या कोणत्या कारणाने जाळल्या या गोळ्या वापरल्यात का? नाही याची चौकशी करुन ज्यांनी गोळ्या जाळल्या त्या कर्मचारी वर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!