*मेरी मिट्ठी,मेरा देश अभियान अंतर्गत न.पा.शाळांचा सांस्कृतिक कार्यक्रम* स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त नगर पालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन लोकमान्य टिळक टाऊन हॉल येथे करण्यात आले होते . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, शहरातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांना आमंत्रित करून सत्कार करण्यात आला.सर्व विद्यार्थ्यांना मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत पंचप्रण शपथ देण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमात सर्व नगर पालिका मराठी व उर्दू शाळा तसेच म्युनिसिपल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले आहे. प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे,प्रशासकीय अधिकारी जगदिश पदमर, नगर पालिकेचे सर्व कर्मचारी,पालक व सर्व शाळांचे मुख्याध्यापक ,शिक्षक , म्युनिसिपल शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वजीत पटेल,मुक्तार अन्सारी, कय्युम खान,राजू डूडवे, सुत्रसंचालक रजेसिंग भिल यांच्यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. प्रभु नाईक शहादा
Related Posts
कमरावद* येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी एकादशी निमित्त वारकरी संप्रदाय दिंडीचे आयोजन
*कमरावद* येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी एकादशी निमित्त वारकरी संप्रदाय दिंडीचे आयोजन शाळेत जणूकाही विठ्ठल नामाची शाळा भरली होती विद्यार्थी…
आदीवासी टोकरे जमातीची लेक डॉ.प्रियंका झाली एमबीबीएस
आदीवासी टोकरे जमातीची लेक डॉ.प्रियंका झाली एमबीबीएस:नेर: शिंदखेडा तालुक्यातील छोटेशे रंजाणे गावातील अभिलाष हसरत सावळे यांची सुकन्या डॉ.प्रिंयका सावळे हिने…
नेर येथे कानबाई मातेची मिरवणूक काढत केले उत्साहात विसर्जन
*नेर:* *नेर येथे कानबाई मातेची मिरवणूक काढत केले उत्साहात विसर्जन:* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथे खानदेशाची आराध्य दैवत कानबाई मातेचे…