मालपुर ग्रामपंचायत चा अजब कारभार, ग्रामसभा झालीच नाही
मालपुर प्रतिनिधी गोपाल कोळी
मालपुर ता. शिंदखेडा
शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामसभा या 15 ऑगस्ट 26 जानेवारीला होत असतात. त्या अनुषंगाने तब्बल बारा महिने झाले तरी देखील ग्रामसभा झालेली नाही. ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार ग्रामपंचायतचा निधी बाबतीत मालपुर जनता अंधारात त्यांच्या या आणा गोंदी कारभारामुळे, जनतेचे प्रश्न जनतेच्या मनातच राहिले, ग्रामसेवक म्हणतो, मी प्रभारी ग्रामसेवक आहे. माझ्या सवडीनुसार पुन्हा कधीतरी घेऊग्रामसभा. अशा मनमानी कारभारीला मालपुर कर जनता कंटाळली आहे, ग्रामसभा न होणे म्हणजे बोगस कारभाराला खत पाणी देणे आहे. जनतेचे विविध प्रश्न उपलब्ध असून त्यांच्या निराकरणासाठी ग्रामसभा झालेलीच नाही. नुकतेच प्राप्त माहितीनुसार तलाठी कार्यालयासाठी निधी आणला आहे. परंतु जागा शोधण्यामध्ये वेळ व्यर्थ घालत आहेत. अशा अनेक विविध बाबी लोकांच्या आहेत. ग्रामविकास अधिकारी ला फोन केला असता स्वीच ऑफ येतो. प्रसार माध्यमांना उत्तर देण्यास नकार देतो. चला तर पाहूया यांच्या मनमानीला खतपाणी कुठेमृतय.
मालपुर हे गाव शिंदखेडा तालुक्यातील एक मोठे गाव आहे येथे शासकीय अधिकारी टिकतच नाही. येथे शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. तलाठी महाशय देखील प्रभारीच आहेत. आणि आता ग्रामसेवक देखील प्रभारीच आहे हक्काचा माणूस नाही म्हणून कारभार गोंधळाचा दिसतो. तरी वरिष्ठांनी लवकरात लवकर याची दखल घ्यावी मुख्य ग्रामसेवक, मुख्य तलाठी यांची पदे भरली गेली पाहिजेत अशी मागणी मालपुर जनतेला आहे.