स्वो. वि.संस्थेच्या दादासाहेब रावल माध्य व उच्च माध्य विद्यालय मालपूर येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मालपुर प्रतिनिधी गोपाल कोळी
मालपुर ता. शिंदखेडा आज दिनांक १५-०८-२०२३ रोजी श्रीमान दादासो. महाविरसिंहजी रावल स्थानिक स्कुल कमेटी चेअरमन व सभापती शिक्षण व आरोग्य जि प धुळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . सुरूवातीस लेझिमच्या पथकासोबत प्रमुख पाहुण्यांचे आदरातीथ्य करण्यात आले.याप्रसंगी गावाचे प्रथम नागरिक व लोकनियुक्त सरपंच श्री मच्छिंद्र शिंदे , स्थानिक स्कुल कमेटीचे उपाध्यक्ष श्री मगनआप्पा बागुल , व्यांघ्रबरी डेअरी चेअरमन श्री पोपट बागुल ,सर्व ग्रा पं सदस्य , वि वि सेवा सोसायटी सदस्य ,,गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी ,पत्रकार बंधु , डी आर हायस्कुल दोंडाईचाचे माजी मुख्याध्यापक श्री एस एम पाटोळे सर , दादासाहेब रावल हायस्कूल मालपूरचे माजी मुख्याध्यापक श्री आर डी वसईकर सर , आजी माजी विद्यार्थी .शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक बापूसो श्री ए एन पाटील सर ,
शाळेच्या पर्यवेक्षिका सौ भावे मॕडम ग्रंथपाल श्री प्रमोदजी भाऊसाहेब सर्व *, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होते.कार्यक्रमात जैन सोशल गृपतर्फे गरजु व गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.तसेच लो.टिळकांच्या पुण्यतिथी निमीत्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आल्यानंतर आदरणीय श्रीमान महाविर दादांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री एस के ठाकरे सरांनी केले.
लेझिम पथकाला श्री के डी पवार , श्री डी आर ठाकरे , श्री पवन निकम श्री एस पी भावसार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमास स्वो. वि. संस्थेचे अध्यक्ष विकासरत्न आदरणीय सरकार साहेबजी रावल संस्थेचे सचिव माननीय जयकुमारजी भाऊ रावल तसेच संस्थेचे खजिनदार मा.सी.एन. भाऊसाहेब तसेच संस्थेचे सामान्य प्रशासन सचिव मा. ललितसिंह भाऊसाहेब यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर बंधू भगिनीचे सहकार्य लाभले.