*आज जिल्हा परिषद शाळा मोहिदे त.श. येथे ७६ वा स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा*

*आज जिल्हा परिषद शाळा मोहिदे त.श. येथे ७६ वा स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा……* आज जिल्हा परिषद शाळा मोहिदे त.श. येथे १५ ऑगस्ट २०२३ रोजी ७६ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण जि प सदस्य जिजाबाई ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर स्वातंत्र्यदिन बाबत महत्व विशद करण्यात आले. त्यानंतर स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यातील १ ते ३ क्रमांकाच्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यानंतर घन:श्याम सोनवणे व मित्र मंडळ ग्रुप यांच्याकडून शाळेतील ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नंतर फिल्टर व वॉटर कुलरचे मान्यवरांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास जि प सदस्य जिजाबाई ठाकरे, सरपंच श्रद्धा पाटील, उपसरपंच ललिताबाई पाटील,शा.व्य. समिती अध्यक्ष शरद भील,पो. पाटील मुकेश गवळे, भाऊभाई पाटील, पुरुषोत्तम पाटील, प्रकाश गिरासे, रत्‍नाबाई गिरासे, अरुणाबाई महिरे,सुनील गायकवाड, प्रकाश पाटील, राजाराम पाटील, अर्जुन पाटील,सतिलाल महिरे, रवींद्र पिंपळे, कलुबाई भील, मधुभाई पाटील, पत्रकार बंधू के.बी.गिरासे, ग्रामस्थ , मुख्याध्यापक छोटूलाल पाटील,सर्व शिक्षक वृंद , अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!