*शनिवार पर्यंत ८०० पैकी १०० दाखले देणार..प्रांताधिकाऱ्यांचे अभिवचन..*अन्यथा सोमवार पासून पुन्हा आंदोलन करणार..जगन्नाथ बाविस्कर यांची स्पष्टोक्तीयावल ( गोकुळ कोळी):-* चोपडा तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना अनुसूचित जमातीचे टोकरेकोळी (एसटी) चे दाखले सुलभ पध्दतीने मिळावीत यासाठी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर यांनी ९ ऑगस्ट पासून प्रांत कार्यालयासमोर शेकडों समाज बांधवांना सोबत घेऊन तीव्र अन्नत्याग सत्याग्रह, मुक मोर्चा व ठिय्या आंदोलन सुरू केलेले होते. सत्याग्रहाच्या सहाव्या दिवशी प्रांताधिकारी यांनी १२ दाखले देण्याचे कबुल करून शनिवार पर्यंत प्रलंबित ८०० पैकी १०० दाखले देणार, असे अभिवचन दिले आहे. म्हणून तूर्तास अन्नत्याग सत्याग्रह स्थगित करण्यात आला आहे. तसे न झाल्यास पुन्हा सोमवार पासून कोळी समाजातर्फे तीव्र लाक्षणिक उपोषण, धरणे आंदोलन, रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, अशीही स्पष्टोक्ती अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर यांनी यावेळी केलेली आहे. याप्रसंगी माजी विधानसभाध्यक्ष अरूणलाल गुजराथी, चोसाकाचे माजी चेअरमन घन:शाम पाटिल, व्हा.चेअरमन शशीभाऊ देवरे, माजी जि.प.सदस्य शांताराम सपकाळे, जेष्ठ समाजसेवक लखिचंद बाविस्कर, प.स.चे माजी सभापती डि.पी.साळुंकेसर, उपसभापती गोपाळराव सोनवणे, सदस्य भरत बाविस्कर, नगरसेवक कैलास सोनवणे, सुतगिरणीचे संचालक कैलास बाविस्कर, भाजपाचे नेते मगन बाविस्कर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटिल, बीआरएसच्या जिल्हा महिला समन्वयक सौ.कोमलताई पाटिल, धुळे जिल्हा समन्वयक एडव्होकेट अविनाश पाटिल, तालुकाध्यक्ष दिपक पाटिल, गोरगावलेच्या माजी सरपंच सौ.आशाबाई बाविस्कर, व्यापारी महामंडळाचे संचालक वैभवराज बाविस्कर, प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस अधिकारी रावलेसाहेब, पी.आय. के.के.पाटिल, गोपनियचे विलेश सोनवणे, सामा.पदाधिकारी आर.एल.बाविस्कसर, भाईदास बाविस्कर, भरतराव पाटिल, बाळुभाऊ कोळी, प्रेमनाथ बाविस्कर, दिनकर सपकाळे, अनिल कोळी, पंकज रायसिंग, विशालराज बाविस्कर, यांचेसह आदिवासी कोळी जमातीचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते…………………………………………… *कोळी लोकांनी दाखल्यांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत..* चोपडा (अ.ज.)विधानसभा मतदारसंघातील आदिवासी कोळी लोकांनी चोपडा प्रांताधिकारी यांच्याकडे सेतू सुविधा केंद्रामार्फत ऑनलाईन पद्धतीने दाखल्यांसाठीची प्रकरणे सादर करावीत. प्रकरणांसोबत सबळ पुरावे जोडण्यात यावे. याबाबत अधिक माहितीसाठी जेष्ठ मार्गदर्शक लखिचंद बाविस्कर (निवास- म.वाल्मिकनगर,चोपडा) यांचेशी संपर्क करावा. *– जगन्नाथ बाविस्कर/तालुकासंपर्कप्रमुख* आदिवासी टोकरे कोळी जमात मंडळ,चोपडा…………………………………………………..
Related Posts
लोकांच मनोरंजन व्हाव आणि मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी अनेक स्पर्धाचें आयोजन
*सार्वजनिक गणेशोत्सव -२०२३* *साई श्रध्दा पार्क फेज -२* *जुना शिरपूर रोड चोपडा* काॅलनी तील लोकांच *मनोरंजन* व्हाव आणि मुलांच्या *कला…
विभागीय आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग)यांनी वनक्षेत्रपाल कैलास अहिरे (सामाजिक वनीकरण यावल)यांच्या विरोधात हेमकांत गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारी संदर्भात कार्यवाहीचे दिले आदेश
विभागीय आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग)यांनी वनक्षेत्रपाल कैलास अहिरे (सामाजिक वनीकरण यावल)यांच्या विरोधात हेमकांत गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारी संदर्भात कार्यवाहीचे दिले…
चोपडा नगर परिषदेच्या विरोधात
भव्य मुक जन आक्रोश मोर्चा
उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांची घटनास्थळी भेट..
चोपडा नगर परिषदेच्या विरोधातभव्य मुक जन आक्रोश मोर्चाउपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांची घटनास्थळी भेट.. चोपडा विश्वास वाडे प्रतिनिधी आज सकाळी दहा…