शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे गावाचे स्वातंत्र्य दिनीच स्वातंत्र्य सैनिकांचा वारसांच्या रास्ता रोको

*शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे गावाचे स्वातंत्र्य दिनीच स्वातंत्र्य सैनिकांचा वारसांच्या रास्ता रोको**दोडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळी शिदखेडा तालुक्यातील दलवाडे हे गावस्वातंत्र्यवीरांची भूमी म्हणून ओळख असलेल्या शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे या गावच्या स्वतंत्र सैनिकांना वारसांनचा व ग्रामस्थांना गावाच्या विकासासाठी प्रशासनाला जागे करण्यासाठी, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असलेल्या स्वातंत्र्य दिनीच रास्ता रोको करावा लागला आहे,गावाला गेल्या कित्येक वर्षांपासून विकास निधी मिळत नसल्यामुळे गावाचा विकास खुंटला असल्याचा आरोप संतप्त आंदोलकांनी लावला असून, देशाच्या रक्षणासाठी आयुष्य घालवलेल्या स्वतंत्र सैनिकांनी वारसांनी रास्तारोकोमध्ये सहभागी होत प्रशासना विरोधात देखील आता लढाई लढणार असल्याची भावना व्यक्त केली आहे, त्याचबरोबर सुस्त झालेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हा रास्ता रोको केला असल्याचे या आंदोलनकर्त्यांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे, पुढील काळात लवकरात लवकर गावाच्या विकास कामांसाठी विकास निधी देण्यात आला नाही तर आणखीन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलक माजी सैनिकांनी प्रशासनाला दिला आहे.यावेळी आंदोलन पाठीबा देण्यासाठी कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष शामकांत सनेर व सुरेश देसले. सुनील चौधरी.राष्ट्रवादी चे विधानसभा क्षेत्र प्रमुखदिपक गिरासे. सरपंच रजेसिंग गिरासे. उपसरपंच लक्ष्मण मोरे.भाऊसाहे देसले. निलेश देसले. शशिधर देसले. ज्ञानेश देसले. महेंद्र देसले. कपुर पेंन्टर.किरण देसले. राजेंद्र देसले. भटू अन्ना राहुल कोळी.भीमराव देसले. व महीला बघनी .युवा व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शासना कडुन तालुक्यातील पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सावकारे साहेब. व त्याचे सहकारी बाधकाम क्षेत्रातील अभियंता शिवाजी पाटील साहेब यानी निवेदन स्वीकारले ग्रामस्थांनी निवेदन म्हटले आहे की येत्या एक-दोन महिन्यात गावाचे विकासाचे काम सुरू नाही झाले तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल अशा इशारा गावकऱ्यांन कडून देण्यात आलेला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!