स्वानंद मित्र मंडळाच्यावतीने पूर्ण प्राथमिक शाळा नागवे नं१या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

स्वानंद मित्र मंडळाच्यावतीने पूर्ण प्राथमिक शाळा नागवे नं१या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ———————————————————-कणकवली(गुरुनाथ तिरपणकर)-रौप्यमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्वानंद मित्र मंडळ नागवे या सामाजिक विकास संस्थेकडुन कणकवली तालुक्यातील नागवे या गावातील पूर्ण प्राथमिक शाळा नागवे नं१या शाळेतील गुणवंतांचा सत्कार व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.सर्व प्रथम सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेशजी(गोट्या)सावंत,महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर,जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,सरपंच सिध्दीका जाधव,करंजे गावच्या सरपंच सपना मेस्त्री,पोलिस पाटील प्रमोद सावंत व इतर प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत सरस्वती पुजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.याप्रसंगी उप सरपंच महेंद्र कुडाळकर,दिगंबर नानचे,माजी सरपंच नारायण आद्रेकर,ग्रामपंचायत सदस्य संदेश सावंत,कु.कश्मीरा गोठणकर,बाबा मोर्ये,राजु पारकर,रविंद्र नानचे,सचिन खेडेकर,सत्यप्रकाश सावंत,मुख्याध्यापिका मेस्त्री मॅडम,खोचरेकर सर,अशोक नानचे,श्रुती ढवण,वैभव नानचे आदी मान्यवर उपस्थित होते.व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांचे रवि नानचे यांनी शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच ७५मुलांना पेन,पेन्सिली,रबर,शार्पनर,पट्टी,रंगपेटी,चित्रकला वही,छत्री,वह्या,दफ्तर अशा विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.तसेच खाऊ वाटपही करण्यात आले.व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे व मान्यवरांची सर्व समावेशक व मार्गदर्शनपर भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.खोचरेकर सर यांनी केले.व शाळेच्या मुख्याध्यापिका मेस्त्री मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाला नागवे पंचक्रोशीतील ग्रामस्थ,शाळा नियोजन समितीचे पदाधिकारी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!