मानव विकास पत्रकार संघ धुळे तालुका ग्रामीण अध्यक्षपदी पत्रकार दिलीप साळुंखे यांची निवड

*मानव विकास पत्रकार संघ धुळे तालुका ग्रामीण अध्यक्षपदी पत्रकार दिलीप साळुंखे यांची निवड* प्रतिनिधी गोपाल कोळीधुळे तालुक्यातील नेर येथील पत्रकार दिलीप साळुंखे यांची पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असुन त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना शिरपूर येथे दिनांक १५/०८/२०२३ मंगळवार रोजी नुकत्याच जाहीर झालेल्या मानव विकास पत्रकार संघ कार्यकरणीत धुळे तालुका ग्रामीण अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.तसेच मानव विकास पत्रकार संघ म्हणजे मानवाच्या कल्याणाकरिता अहोरात्र परिश्रम करणारा संघ होय. पत्रकार संपादक प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया श्रमिक गरीब वंचित सामान्य जनतेच्या हक्काकरिता व त्यांचा न्याय मिळवून देण्याकरिता सामाजिक बोधले की प्रामाणिकपणे निस्वार्थ भावना प्रवृत्ती अशा विचारांच्या संकल्पनेतून मानव विकास पत्रकार संघाचा उदय २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित साधून झाला होता. तसेच आपण मानव विकास पत्रकार संघात सामील झालेत व मानव धर्म हाच एक धर्म अशा विचाराने आपणास पुढे मानवाच्या कल्याणाकरिता आपल्याला काम करण्याचे असून आपणास सहभागी करताना अत्यंत आनंद होत असून आपली मानव विकास पत्रकार संघाच्या धुळे तालुका ग्रामीण अध्यक्ष म्हणून आपण आपली निवड करण्यात आली आहे. दिनांक १५/०८/२०२३ पासुन ते २६/०८/२०२४ पर्यंत या कालावधी करिता नियुक्ती करण्यात येत आहे तसेच मानवाचा विकास करण्याकरिता आपणास उदंड प्रतिसाद ऊर्जा मिळावी व तळा गाळा पर्यंत मानव विकास पत्रकार संघाचे कार्य अहोरात्र सुरूच असाव्याशी आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.तसेच यावेळी संस्थापक,अध्यक्ष,उपाध्यक्ष, सलागार, मानव विकास संघाचे सर्व सदस्य पत्रकार बंधू बघिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!