*फेस ता. शहादा येथे स्वातंत्र्यदिन कृषिदुतांसमवेत साजरा*दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी , स्वातंत्र्यदिनानिमित्त फेस गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण म्हणजे ध्वजारोहण आणि गावात उभारण्यात आलेले शहीद स्मारक. या स्मारकाचे उद्घाटन गावातील माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात आले .तसेच शहीद सैनिकांच्या वीरांगना सुनीता गवळे आणि रुक्मिणी शेमळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी सैनिक विजय सावळे ,किशोर पाटील, जग्गनाथ कोळी, चूनीलाल पाटील उपस्थित होते.या कार्यक्रमात ग्रामस्थांना गावात उपस्थित के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालय शहादा चे कृषिदुत रविनंद पाटील,मयुरेश भामरे , हर्षल शिंदे , भूषण पाटील ,सतिष पाटील व हर्षल पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. देशाचे पंतप्रधान मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांनी ‘पंचप्रण शपथ’ घेतली. सोबतच ‘तंबाखू मुक्त भारत’ ची शपथ घेत व मागील वर्षाच्या यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन तसेच मान्यवरांच्या मनोगताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Related Posts
रेवाडी आश्रम शाळेचा विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम* गौरव बोरसे
*रेवाडी आश्रम शाळेचा विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम* गौरव बोरसे (रेवाडी):- रेवाडी येथिल आदिवासी सुंदर शिक्षण संस्था संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च…
सर्पमित्र प्राणीमित्र समाजसेविका चैताली भस्मे माणिक रत्न पुरस्कार से सन्मानित
*सर्पमित्र प्राणीमित्र समाजसेविका चैताली भस्मे माणिक रत्न पुरस्कार से सन्मानित*ग्राम स्वराज्य महामंच, यावतमाल, के ओर से स्मरणिका प्रकाशन और समाजसेवा…
मुदतीत माहिती न देणे अधिकाऱ्याला भोवले; 56 हजारांचा दंड ठोठावला!* राज्य माहिती आयुक्तांचा जोरदार दणका. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या तक्रारीची घेतली दखल.
*मुदतीत माहिती न देणे अधिकाऱ्याला भोवले; 56 हजारांचा दंड ठोठावला!* राज्य माहिती आयुक्तांचा जोरदार दणका. *अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या…