*नेर येथे आरोग्य केंद्रात चार खाटांचे जि.प.सदस्य आनंदराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन:* *जि.प.सदस्य आनंदराव पाटील यांचे विशेष प्रयत्न* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथे आरोग्य केंद्रात चार खाटांचे जि.प.सदस्य आनंदराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तसेच जनतेला आरोग्य सेवा व सुविधा पुरविता याव्यात म्हणून धुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून नेर प्राथमिक आरोग्य केंद्रात चार खाटांच्या आरोग्य केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. धुळे ग्रामीणचे लाडके आमदार बाबासाहेब कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि नेर गटाचे जिल्हा परिषद सदस्य श्री आनंदराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तब्बल 15 लक्ष रुपये खर्चून चार खाटांच्या आरोग्य केंद्राचे भुमिपुंजन आज जि.प.सदस्य श्री आनंदराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे.भूमिपूजन कार्यक्रमाला करण्यात आला होता.तसेच यावेळी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव पाटील,पं.स.सदस्य मांगू दादा मोरे,सरपंच मा. गायत्रीदेवी जयस्वाल,उपसरपंच जाकीर तांबोळी,सामाजिक कार्यकर्ते बाळू आण्णा सोनवणे,जगन्नाथ सोनवणे,विजय देशमुख,प्रकाश खलाने,आर.डी.माळी,सुरेश सोनवणे, साहेबराव गवळे,दयाराम पारधी,जितू पैलवान,सुनिल चौधरी,पवन कोळी,वसंत सोनवणे,वसंत देशमुख, भैय्या आटले,चंदू सोनवणे,योगेश सोनवणे,इजि. ऋती वाघ,पंकज वाघ , संजय खरवंदे, मुकुंद फौजी,मधूकर अहिरे,शेख रुबाब दादा,डॉ.राजीव मावची,आरोग्य केंद्रातील सिस्टर ललित कोलटके,सिस्टर योगिता परदेशी आरोग्य सेवक शुभम परदेशी आदी आजी माजी कार्यकर्ते उपस्थित होते.या कामाबद्दल जनतेकडून जि.प.सदस्य श्री.आनंदराव पाटील यांचे कौतुक देखील नेर ग्रामस्थांना कडून करण्यात येत आहे.
Related Posts
नंदुरबार येथील टोकर तलाव डोंगरावरील मजुरांना पाण्याचे चालते फिरते ड्रामस् वाटप*
*नंदुरबार येथील टोकर तलाव डोंगरावरील मजुरांना पाण्याचे चालते फिरते ड्रामस् वाटप*नंदुरबार तालुक्यातील टोकर तलाव येथील डोंगर माथ्यावर वनविभाग यांच्या मदतीने…
बिबट्याचा पुन्हा मानवावर हल्ला,
बिबट्याचा पुन्हा मानवावर हल्ला,* प्रतिनिधी – संजय गुरव* तळोदा तालुक्यातील दलेलेपूर शिवारात पुन्हा एकदा बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला करून त्याला…
कायद्याचे मूळ स्वरूप समजणे आवश्यक – श्री अविनाश मोकाशी
कायद्याचे मूळ स्वरूप समजणे आवश्यक – श्री अविनाश मोकाशी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित नसरापूर शंकरराव भेलके महाविद्यालयामध्ये रॅगिंग विरोधी…