तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारात शेतात बिबट्या च्या हल्ल्यात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. बिबट्या चा मुक्त संचार मुळे मानवावर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतकरी व शेतमजुरात भीतीचे वातावरण पसरले आहे.दलेलपूर शिवारात गुलाब सत्तार धानका व दामू सत्तार धानका यांच्या शेतात बिबट्या ने गुरुदेव भरत वसावे वय 11 वर्ष या बालकावर हल्ला केला बालकाचा मृत्यू झाला आहे. वनविभागाचे वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे, जाण्या पाडवी, आशुतोष पावरा, राहुल कोकणी, डोंगरे आदीभेट दिली पंचनामा केला तळोदा पोलिसात नोंद झाली आहे दलेलपूर अमोनि परिसरात बिबट्या हल्ल्याची दुसरा बळी गेला आहे बिबट्या चा बंदोबस्त व उपाययोजना करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी वनविभागा कडे केली आहे.
तळोदा तालुक्यातील दलेलपूर येथे दहा वर्षे बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू
